एक्स्प्लोर
Advertisement
तुम्ही तुमच्या डेबिट कार्डवर किती चार्ज देता?
डेबिट कार्डबाबत बँका तीन प्रकारचे चार्जेस आकारु शकतात. यामध्ये दुसऱ्यांदा डेबिट कार्ड मागवणे, डेबिट कार्डचा वार्षिक मेंटेनन्स आणि डेबिट कार्डचा पिन मिळवणे यासाठीच्या चार्जचा समावेश होतो.
मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात डेबिट कार्डचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. डेबिट कार्डद्वारे आपण बँकिंगशी निगडित अनेक कामं करतो. एटीएममधून पैसे काढणे, शॉपिंग करणे अशी कामे करण्यासाठी डेबिट कार्डचा सर्वात जास्त वापर केला जातो. यातील अनेक डेबिट कार्ड मोफत असली तरीही काही डेबिट कार्ड वापरताना मात्र आपल्याला चार्ज द्यावा लागतो.
भारतातील एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी यांसारख्या बँकाकडून दुसऱ्यांदा डेबिड कार्ड घेण्यासाठी 200 ते 300 रुपये आणि त्यासोबतच जीएसटी अशी रक्कम आकारली जाते. दुसऱ्यांदा डेबिट कार्ड घेताना तुमची बँक तुमच्याकडून किती पैसे घेते, याबाबत तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे.
डेबिट कार्डबाबत बँका तीन प्रकारचे चार्जेस आकारु शकतात. यामध्ये दुसऱ्यांदा डेबिट कार्ड मागवणे, डेबिट कार्डचा वार्षिक मेंटेनन्स आणि डेबिट कार्डचा पिन मिळवणे यासाठीच्या चार्जचा समावेश होतो.
डेबिट कार्डचा वार्षिक मेंटेनन्स चार्ज
एसबीआय आपल्या ग्राहकांकडून डेबिट कार्डसाठी 125 रुपये एवढा वार्षिक मेंटेनन्स चार्ज घेते. यासंदर्भातील माहिती त्यांच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
आयसीआयसीआय बँक ग्राहकांच्या कोरल कार्डला सोडून इतर कोणत्याही कार्डवर वार्षिक चार्ज घेत नाही. पण कोरल डेबिट कार्डसाठी जॉयनिंग फीच्या रुपात 499 रुपये वसुल केले जातात. तसंच मेंटेनन्सचीही तेवढीच फी आयसीआयसीआय बँक आकारते.
एचडीएफसी बँक प्लॅटिनम डेबिट कार्डसाठी 750 रुपये रिन्यूएबल चार्ज आकारते.
दुसऱ्यांदा डेबिट कार्ड घेण्यासाठीचा चार्ज
दुसऱ्यांदा डेबिट कार्ड घेण्यासाठी एसबीआय ग्राहकांकडून 300 रुपये आकारते, ज्याची माहिती sbi.co.in वर दिली गेली आहे.
आयसीआयसीआय बँक पुन्हा नवं डेबिट कार्ड घेण्यासाठी 200 रुपये चार्ज घेते.
एचडीएफसी बँकही डेबिट कार्ड पुन्हा घ्यायचे असेल तर शुल्क आकारते. त्यांच्याकडून यासाठी 200 रुपये शुल्क आकारले जाते.
डेबिड कार्डचा पिन दुसऱ्यांदा मिळवणे
एसबीआयच्या वेबसाईटनुसार, डेबिट कार्डचा पिन दुसऱ्यांदा मिळवण्यासाठी त्यांच्याकडून 50 रुपये आणि त्यावरील जीएसटी असा चार्ज घेतला जातो.
आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट कार्डचा पिन पुन्हा मिळवण्यासाठी ग्राहकांना 25 रुपये मोजावे लागतात. पण जर तुम्ही बँकेच्या आयव्हीआर सर्व्हिसद्वारे इंस्टापिन घेत असाल तर तुम्हाला हा चार्ज द्यावा लागत नाही.
एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांकडून दुसऱ्यांदा पिन जनरेट करण्याचे 50 रुपये घेते. जर तुम्ही मोबाईल बँकिंगद्वारे पिन जनरेट केला, तर मात्र तुम्हाला एचडीएफसी बँकेला हा चार्ज द्यावा लागत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
ठाणे
विश्व
Advertisement