Badrinath Dham: जय बद्री विशाल! सहा महिन्यांनी बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, 15 क्विंटल फुलांनी मंदिराची सजावट
Badrinath Dham: दरवाजे उघडण्यापूर्वीच पहिले शंकराचर्य अविमुक्तेश्वानंद मंदिरात पोहोचले होते. आज बद्रिनाथचे दरवाजे उघडल्यानंतर खऱ्या अर्थाने चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे.
Badrinath Dham: केदारनाथनंतर आता बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले. मंदिराला 15 क्विंटल झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आलंय. सकाळपासून बर्फ पडत असतानाही शेकडो भाविकांनी मंदिराबाहेर गर्दी केली. लष्करानं बँडची धून वाजवली तर भाविकांनीही दिल्या जय बद्री विशालच्या घोषणा देण्यात आल्य. दरवाजे उघडण्यापूर्वीच पहिले शंकराचर्य अविमुक्तेश्वानंद मंदिरात पोहोचले होते. आज बद्रिनाथचे दरवाजे उघडल्यानंतर खऱ्या अर्थाने चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे.
चारधाम (chardham) यात्रा करणे हे देखील भारतीय संस्कृतीत पवित्र मानले जाते. बद्रिनाथ ( Badrinath ) हे चारधाम यात्रेतील एक धाम आहे. बद्रिनाथमध्ये भगवान विष्णूंचा वास आहे. बारा महिने येथे भगवान विष्णूचा वास असतो. बद्रिनाथमध्ये भगवान विष्णू सहा महिने आराम करतात तर सहा महिने भक्तांना दर्शन देतात. पुढील सहा महिने सर्व देवता भगवान विष्णूची पूजा करतात. यामध्ये देवर्षी नारद हे प्रमुख पुजारी असतात.
चारधाम यात्रेपैकी एक आणि महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या बद्रीनाथ धाम मंदिराचे दरवाजे पारंपरिक रितीरिवाजानुसार खुले करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मंदिरातील पहिली पूजा करण्यात आली. मंदिराची द्वारे खुली करण्याच्या प्रक्रियेसाठी संपूर्ण मंदिरावर झेंडुंच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे खुले झाल्यावर चारधाम यात्रेची औपचारिक सुरुवात झाल्याची घोषणा करण्यात आली.
प्रचंड थंडी असूनही मंदिराचे दरवाजे उघडताना हजारो भाविक बद्रिनाथ धाममध्ये पोहोचले आहेत. बद्रिनााथ धाममध्ये अधूनमधून होणारी बर्फवृष्टी आणि पाऊस पाहता त्यांनी भाविकांना यात्रा सुरू करण्यापूर्वी राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आणि प्रतिकूल हवामान लक्षात घेता निवासाची व्यवस्था अगोदरच करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
केदारनाथसाठी भाविकांची नोंदणी 30 तारखेपर्यंत थांबवली
दुसरीकडे, हवामान खात्याने 29 एप्रिलपर्यंत बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे, राज्य सरकारने रविवारी केदारनाथसाठी भाविकांची नोंदणी 30 तारखेपर्यंत थांबवली. ऋषिकेश, गौरीकुंड, गुप्तकाशी आणि सोनप्रयागसह अनेक ठिकाणी यात्रेकरूंना सध्या तिथेच थांबण्यास सांगितले जात आहे.
चारधाम यात्रेला 22 एप्रिलपासून सुरू
उत्तराखंडची चारधाम यात्रा शनिवारी 22 एप्रिलपासून सुरू झाली आहे.. 22 एप्रिलला गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजा उघडले तर 27 एप्रिलला बद्रिनाथ धामचा दरवाजे उघडले आहेत. खरंतर केदारनाथ मंदिर 22 एप्रिल म्हणजेच अक्षय्य तृतीयेलाच खुलं होणार होतं. मात्र प्रचंड बर्फवृष्टी आणि पावसामुळे 25 एप्रिल ही तारीख ठरवण्यात आली.