PM Modi : पंतप्रधान आज मायदेशी परतणार, दिल्लीला न जाता थेट बंगळुरुमध्ये जाणार, इस्रोच्या शास्त्रज्ञांची घेणार भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा संपवून आज (25 ऑगस्ट) भारतात परतणार आहेत. पण पंतप्रधान मोदींचं विमान दिल्लीत न जाता थेट बंगळुरुमध्ये जाणार आहे.
Chandrayaan-3: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या दौऱ्यावर आहेत. हा त्यांचा दौरा संपवून ते आज (25 ऑगस्ट) भारतात परतणार आहेत. पण पंतप्रधान मोदींचं विमान दिल्लीत न जाता थेट बंगळुरुमध्ये जाणार आहे. चांद्रयान-3 (chandrayaan 3) मोहिमेत सहभागी असलेल्या इस्रोच्या टीमच्या सर्व शास्त्रज्ञांची (isro scientists) पंतप्रधान भेट घेणार आहेत. तसेच त्यांचे अभिनंदन देखील पंतप्रधान करणार आहेत.
दोन देशांचा दौरा संपवून पंतप्रदान नरेंद्र मोदी हे आज मायदेशी परतणार आहेत. ते आज बंगळुरुमध्ये येणार आहेत. चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी असलेल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांची पंतप्रधान भेट घेणार आहेत. तसेच सर्वाचं अभिनंदन देखील करणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान शास्त्रज्ञांशी चर्चा देखील करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी चांद्रयान 3 च्या यशानंतर इस्रो प्रमुखांशी फोनवरुन संवाद साधला होता. यावेळी लवकरच बंगळुरुला येऊन प्रत्यक्ष भेट घेईल, असं त्यांनी म्हटलं होतं.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत पहिला देश
भारताच्या मिशन चांद्रयान-3 ने (Chandrayaan 3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरून इतिहास रचला आहे. विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याच्या काही क्षण आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथून लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे सहभागी झाले होते. चांद्रयान-3 च्या भव्य यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील सर्व नेत्यांनी इस्रोचं तोंडभरून कौतुक केलं आहे. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे भारत हा चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. पंतप्रधान मोदींनी दक्षिण आफ्रिकेतून चांद्रयान-3 चं लाईव्ह लँडिंग पाहिलं. इस्रोचं मिशन यशस्वी होताच पंतप्रधान मोदींनी इस्रो प्रमुखांशी फोनवरुन संवाद साधला.
हा क्षण भारतासाठी नवी उर्जा, प्रेरणा आणि शक्ती देणारा
चांद्रयान -3 चं यशस्वी लँडिंग झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशवासियांशी देखील संवाद साधला होता. ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचं म्हणत त्यांनी इस्रोच्या शास्रज्ञांचे यावेळी आभार मानले. 'हा क्षण ऐतिहासिक, अभूतपूर्व आहे, हा क्षण विकसित भारताचा शंखनाद आहे. जेव्हा आपण अशी कोणतीही ऐतिहासिक घटना अनुभवतो तेव्हा आपलं जीवन सार्थ होतं. हा क्षण भारतासाठी नवी उर्जा, प्रेरणा आणि शक्ती देणारा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या: