Chandrayaan 3 : चांद्रयान 3 च्या यानाने पाठवला चंद्राचा पहिला फोटो..
Chandrayaan 3 Landing Live Updates : भारताचा चांद्रयान-3 या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.
LIVE
Background
Chandrayaan 3 Landing LIVE : आज २३ ऑगस्ट २०२३. आजचा दिवस आणि संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांची वेळ हा ऐतिहासिक क्षण भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. कारण याच क्षणी भारताच्या भाळी ऐतिहासिक यशाचा टिळा लागणार आहे. याला कारण ठरतंय भारताची चांद्रयान-३ मोहीम. संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं भारताचं चांद्रयान-३ आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांच्या ठोक्याला चंद्रावर लॅण्ड होणार आहे. त्यानंतर चांद्रमोहीम यशस्वी करणाऱ्या चार देशांमध्ये भारताचं नाव गौरवानं घेतलं जाणार आहे.
भारतासाठी अत्यंत अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि गौरवाची असलेली चांद्रयान-३ मोहीम आता शेवटच्या टप्प्यात आहेत. चांद्रयान-३च्या सॉफ्ट लॅण्डिंगचं काऊंटडाऊन काल संध्याकाळपासून सुरू झालंय. लँडर मॉड्युलसोबत अवकाशातून आणि जमिनीवरून अखंड संपर्काची तयारी पूर्ण झालीय. या क्षणाला चांद्रयान-३ चंद्रापासून अवघ्या १५ मैलावर असून लँडिंगची तयारी सुरू झालीय.
भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर सूर्योदयाला सुरुवात होईल आणि चांद्रयानाचं सॉफ्ट लॅण्डिंग होईल. २०१९ मधील चांद्रयान-२चा अनुभव लक्षात घेऊन इस्रोनं चांद्रयान-३ साठी संपूर्ण काळजी घेतली. विक्रम लँडरच्या मागे, पुढे आणि वरील बाजूस अँटेना जोडण्यात आलेत. त्यामुळे लँडर मॉड्युलच्या स्थितीच्या प्रत्येक क्षणाचे अपडेट नियंत्रण कक्षाला मिळतील. चांद्रयान-३च्या लँडिंगपूर्वी दोन तास अगोदर आढावा घेतला जाईल आणि लँडिंगसाठी वातावरण पोषक नसेल तर लँडिंग २७ ऑगस्टपर्यंत लांबणीवर जाऊ शकतं, अशी माहिती इस्रोनं दिलीय..
चांद्रयान-3 च्या लँडिंगचं थेट प्रक्षेपण
भारत अवघ्या काही तासांमध्ये इतिहास रचणार आहे. भारत चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष चांद्रयान-3 कडे आहे. घरबसल्यास आपल्या सर्वांना हा अभिमानाचा क्षण अनुभवता येणार आहे. इस्रोकडून चांद्रयान-3 च्या लँडिंगचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. लँडिंग ऑपरेशन्सचं लाईव्ह प्रक्षेपण MOX/ISTRAC कडून 23 ऑगस्ट रोजू 17:20 वाजता सुरू होणार आहे.
चांद्रयान 3 साठी शेवटचे पंधरा मिनिटं कसोटीचे?
2019 मध्ये चांद्रयान-2 यशाच्या जवळ होतं लॅण्डर मॉड्यूलने चंद्राच्या पृष्ठभागावर 2.1 किमी उंची गाठली होती. किरकोळ तांत्रिक बिघाड झाला आणि लॅण्डर क्रॅश झालं. त्यामुळे चांद्रयान-3साठी ते शेवटचे 15 मिनिटं महत्त्वाची मानली जातात. भारतीय वेळेनुसार 23 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चं लॅण्डर चंद्रावर लॅण्ड होईल पण त्या आधीचे १५ मिनिटं निर्णायक असतील कारण लॅण्डिंगची प्रक्रिया त्या शेवटच्या पंधरा मिनिटातच होणार आहे.
Chandrayaan 3 : चंद्रावरून चांद्रयानाने पाठवला पहिला फोटो
चंद्रावरून चांद्रयानाने पाठवला पहिला फोटो
Chandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) August 23, 2023
Updates:
The communication link is established between the Ch-3 Lander and MOX-ISTRAC, Bengaluru.
Here are the images from the Lander Horizontal Velocity Camera taken during the descent. #Chandrayaan_3#Ch3 pic.twitter.com/ctjpxZmbom
Chandrayaan 3 Mission Successful : 'झंडे पर चांद नहीं. चांद पर झंडा होना चाहिए...', चांद्रयान-3 च्या यशानंतर मीम्सचा पाऊस
Chandrayaan 3 Mission Successful : चांद्रयान-3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर भारतीयांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. इस्रोला शुभेच्छा देणारे अनेक फोटो आणि मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Chandrayaan 3 Landing : चांद्रयान-3 चंद्राच्या कुशीत! शेवटच्या 20 मिनिटांचा थरार कसा होता
Chandrayaan 3 Successful Landing : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचं चांद्रयान-3 चंद्रावर पोहोचलं आहे. या सोबतच भारतानं नवा इतिहास रचला आहे. चांद्रयान-3 च्या लँडिंग आधीची 20 मिनिटे फार महत्त्वाची आणि आव्हानात्मक होती.
Chandrayaan-3 : 'मी चंद्रावर सुखरूप पोहोचलो आणि तुम्ही पण!', चांद्रयान-3 चा इस्रोसाठी खास मेसेज
Chandrayaan-3 ISRO Moon Mission Successful : भारताचं चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचलं आहे. चंद्रावर पोहोचताच चांद्रयान-3 नं इस्रोसाठी खास मेसेज पाठवला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Chandrayaan-3 Landing : अभिमानास्पद! चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग, भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा
Chandrayaan-3 Mission : भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इस्रोचं चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं आहे.