एक्स्प्लोर

Farmers Protest | कृषी कायदे, शेतकरी आंदोलनावरील सुनावणीआधी केंद्राचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र; दिल्ली पोलिसांचाही अर्ज

Farmers Protest : केंद्रीय कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाचा आज 49 वा दिवस आहे. सुप्रीम कोर्ट आज याबाबत आदेश देण्याची शक्यता आहे. मात्र आजच्या सुनावणीआधीच केंद्राने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. तर दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीबाबत सुप्रीम कोर्टात अर्ज केला आहे.

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांबाबत आज सर्वोच्च न्यायालय आदेश देणार आहे. त्याआधीच केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात शेतकरी आंदोलनाबाबत प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. तर दिल्ली पोलिसांनीही शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीबाबत अर्ज दाखल केला आहे.

केंद्र सरकारने म्हटलं आहे की, "कृषी कायदे 20 वर्षांच्या चर्चेअंती घेतलेला निर्णय आहे. हे कायदे घाईगडबडीत बनवलेले नाहीत. देशातील शेतकरी कृषी कायद्यांमुळे आनंदी आहेत. त्यांना नवा पर्याय मिळाला आहे. आम्ही या कायद्यांमध्ये MSP नुसार खरेदी, जमिनीची सुरक्षा, सिव्हिल कोर्टात जाण्याचा अधिकार यांसारख्या मुद्द्यांचा उल्लेख आहे. पण आंदोलक कायदा रद्द करण्याचा हट्ट करत आहेत."

दिल्ली पोलिसांनी काय म्हटलं? शेतकरी आंदोलनावरील सुनावणीआधी दिल्ली पोलिसांनीही सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यामध्ये पोलिसांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रस्तावित ट्रॅक्टर रॅलीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी म्हटलं आहे की, "विरोधाच्या अधिकाराचा अर्थ देशाची मान शरमेने झुकवणं असा होत नाही."

सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?

सुप्रीम कोर्टाने सोमवारी (11 जानेवारी) झालेल्या सुनावणीत तीन कृषी कायद्यांवरुन शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नांवरुन केंद्र सरकारला जबरदस्त झापलं. सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, "शेतकऱ्यांसोबत बातचीत किंवा चर्चा करण्याच्या सरकारच्या पद्धतीने आम्ही अतिशय निराश आहोत." "सरकार या कृषी कायद्यांना स्थगिती देणार आहे की आम्ही ते काम करु?" असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने विचारला.

सरन्यायाधाशी एस ए बोबडे, न्यायमूर्ती ए एस बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही रामासुब्रमण्यन यांचं खंडपीठ या प्रकरणावर सुनावणी करत आहे. खंडपीठाने म्हटलं की, "आम्ही चर्चेच्या प्रक्रियेवर अतिशय निराश आहोत. आम्ही तुमच्या बातचीत बाबत कोणतीही क्षुल्लक टिप्पणी करु इच्छित नाही, पण आम्ही या प्रक्रियेवर अतिशय निराश आहोत."

शेतकरी मागील 49 दिवसांपासून तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावं यासाठी सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्या आहेत, परंतु त्यात तोडगा निघालेला नाही. आता 15 जानेवाला बैठक होणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Somnath Suryawanshi Mother|मला न्याय मिळाला नाही मी इथेच जीव देते, सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आक्रोशManoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Embed widget