एक्स्प्लोर

CAA-NRC: केंद्र सरकारकडून NRC ची प्रक्रिया सुरू? नागरिकांचा डेटाबेस तयार करण्याचा निर्णय

CAA-NRC: केंद्र सरकारकडून NRC ची प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलल्याची चर्चा सुरू झाली आहे. केंद्र सरकारकडून नागरिकांचा डेटाबेस तयार करण्यात येणार आहे.

NRC : दोन वर्षांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची ( National Register of Citizens-NRC) प्रक्रिया सुरू करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील नागरिकांची माहिती जमा असणारे डेटाबेस तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये देशातील नागरिकांच्या जन्म-मृत्यूची माहिती असणार आहे. गृहमंत्रालयाने एका विधेयकातून याचा खुलासा झाला आहे. सध्या राज्यातील स्थानिक प्रशासनाच्यावतीने नागरिकांच्या जन्म-मृत्यूची नोंद ठेवली जाते. 

आधार कार्ड हे मतदार ओळखपत्राशी लिंक करणे हे ऐच्छिक असले तरी  निवडणूक आयोगाने सादर केलेल्या प्रस्तावाला जोरदार विरोध करण्यात आला होता. आता मात्र, केंद्र सरकार या डेटाबेसमध्ये जन्म नोंदणी, मतदार यादी, आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट आणि वाहन चालवण्याचा परवाना आदी माहिती असणार आहे. नव्याने तयार होणाऱ्या डेटाबेसमध्ये या माहितीचा समावेश असावा यासाठी जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यात दुरुस्ती करण्यात  येणार आहे. 

'एनडीटीव्ही'च्या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, भारताचे रजिस्ट्रार जनरल यांच्याकडे या डेटाबेसची जबाबदारी असणार आहे. त्यांच्यासह राज्यांमधील मुख्य रजिस्ट्रारदेखील हे काम करतील. रजिस्ट्रार हे आधार, शिधापत्रिका, मतदार याद्या, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्सच्या प्रभारी विविध एजन्सींना वेळोवेळी अपडेट करतील. 

केंद्र सरकारकडून याबाबतचे विधेयक संसदेच्या आगामी अधिवेशनात सादर करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एनआरसीची घोषणा केली होती. आसाममध्ये सीएएची प्रक्रिया सुरू केल्यानंतर देशातही एनआरसी सुरू होणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. त्यावेळी देशभरातून मोठा विरोध सुरू झाला होता. एनआरसी प्रक्रियेतून अल्पसंख्यांकांना लक्ष्य करण्यात येणार  असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्याशिवाय, देशातील आदिवासी, अनुसूचित-जमाती अशा समाजघटकांकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. त्यांनादेखील देशातून हद्दपार करणार का, आदी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. 

आसाममध्ये झालेल्या 'सीएए' मध्ये अनेक नागरिकांना फटका बसला होता. पिढ्यानपिढ्या आसाममध्ये राहणाऱ्या नागरिकांना बेकायदेशीर ठरवण्यात आल्याचे काही प्रकार समोर आले होते. यामध्ये युद्धात मोठी कामगिरी बजावणाऱ्या लष्करी निवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश होता. स्थानिकांनादेखील फटका बसला होता. त्यामुळे आसाममधील प्रक्रियेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. आसाममधील सीएए प्रक्रियेत अल्पसंख्याकांऐवजी बहुसंख्य हिंदू अपात्र ठरले होते.

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचे 36 तास महत्त्वाचे, अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; पूर्वमान्सून झोडपणार, शुभांगी भुतेंची माहिती
पुढचे 36 तास महत्त्वाचे, अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; पूर्वमान्सून झोडपणार, शुभांगी भुतेंची माहिती
वैष्णवी हगवणे प्रकरणातील टीकेवरुन रुपाली चाकणकरांचं स्पष्टीकरण; रोहिणी खडसेंवरही पलटवार
वैष्णवी हगवणे प्रकरणातील टीकेवरुन रुपाली चाकणकरांचं स्पष्टीकरण; रोहिणी खडसेंवरही पलटवार
IPS बदल्या... रितू खोकर धाराशिवच्या SP, रायगडच्या पोलीस अधीक्षकपदी आचल दलाल
IPS बदल्या... रितू खोकर धाराशिवच्या SP, रायगडच्या पोलीस अधीक्षकपदी आचल दलाल
45 वर्षांपासूनच्या लढ्याला यश; झुडपी जंगल निर्णयाचे स्वागत, मुख्यमंत्र्यांकडून सर्वोच्च न्यायालयाचे आभार
45 वर्षांपासूनच्या लढ्याला यश; झुडपी जंगल निर्णयाचे स्वागत, मुख्यमंत्र्यांकडून सर्वोच्च न्यायालयाचे आभार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mayuri Jagtap | घरात मारहाण, रस्त्यातही मारहाण; नवऱ्याने माहेरी सोडलं म्हणून जीव वाचला - मयुरी जगतापRupali Chakankar On Vaishnavi Hagawane | वैष्णवी हगवणे प्रकरणावर थेट भूमिका; रुपाली चाकणकर 'माझा'वरMayuri Jagtap on Hagwane Family : दगडाने मारायचे, सासऱ्याने कपडे फाडले..मयुरीसोबत काय काय घडलं?Mayuri Jagtap on Hagwane : माझ्या नवऱ्यामुळे मी जीवंत, नणंद, दिराने मारलं; मयुराने सांगितली आपबिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचे 36 तास महत्त्वाचे, अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; पूर्वमान्सून झोडपणार, शुभांगी भुतेंची माहिती
पुढचे 36 तास महत्त्वाचे, अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; पूर्वमान्सून झोडपणार, शुभांगी भुतेंची माहिती
वैष्णवी हगवणे प्रकरणातील टीकेवरुन रुपाली चाकणकरांचं स्पष्टीकरण; रोहिणी खडसेंवरही पलटवार
वैष्णवी हगवणे प्रकरणातील टीकेवरुन रुपाली चाकणकरांचं स्पष्टीकरण; रोहिणी खडसेंवरही पलटवार
IPS बदल्या... रितू खोकर धाराशिवच्या SP, रायगडच्या पोलीस अधीक्षकपदी आचल दलाल
IPS बदल्या... रितू खोकर धाराशिवच्या SP, रायगडच्या पोलीस अधीक्षकपदी आचल दलाल
45 वर्षांपासूनच्या लढ्याला यश; झुडपी जंगल निर्णयाचे स्वागत, मुख्यमंत्र्यांकडून सर्वोच्च न्यायालयाचे आभार
45 वर्षांपासूनच्या लढ्याला यश; झुडपी जंगल निर्णयाचे स्वागत, मुख्यमंत्र्यांकडून सर्वोच्च न्यायालयाचे आभार
वैष्णवीच्या बाळाबद्दलही संशय, मृत्यूनंतर गुंड निलेश चव्हाणच्या घरात चिमुकला; संतापजनक घटनाक्रम
वैष्णवीच्या बाळाबद्दलही संशय, मृत्यूनंतर गुंड निलेश चव्हाणच्या घरात चिमुकला; संतापजनक घटनाक्रम
कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गच्या एसपींची बदली; राज्य पोलीस दलातील 22 पोलीस अधीक्षक/ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गच्या एसपींची बदली; राज्य पोलीस दलातील 22 पोलीस अधीक्षक/ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
धक्कादायक! पुण्यात आणखी एका विवाहितेचा हुंड्यासाठी छळ; 22 वर्षीय पोरीनं संपवलं जीवन
धक्कादायक! पुण्यात आणखी एका विवाहितेचा हुंड्यासाठी छळ; 22 वर्षीय पोरीनं संपवलं जीवन
Chhagan Bhujbal : मी नाशिकचा बालक, पालक कोण होईल याची काळजी का करता? भुजबळांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
मी नाशिकचा बालक, पालक कोण होईल याची काळजी का करता? भुजबळांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Embed widget