एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

आता देशातील शैक्षणिक संस्था होणार तंबाखूमुक्त! केंद्र सरकारने राज्यांना जारी केली मार्गदर्शक सूचना!

देशातील शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त व्हाव्यात त्यामुळे केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्राने देशातील राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांसाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

नवी दिल्ली : देशातील शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्राय आणि आरोग्य मंत्रालयाने संयुक्तपणे देशातील सर्व राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. संपूर्ण देश तसेच केंद्रशासित प्रदेशांत तंबाखूमुक्त नीतीचे पालन केले जावे, असे या मार्गदर्शक सूचनेत म्हणण्यात आलं आहे.

केंद्र सरकारने एका सर्वेक्षणाचा उल्लेख केला

केंद्राच्या आरोग्य आणि शिक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेत तंबाखू सेवनाचे मुलांवर तसेच तरुणांवर होणाऱ्या परिणांबद्दल भाष्य करण्यात आले आहे. सरकारने जारी केलेल्या निवेदनात 2019 सालच्या एका सर्वेक्षणाचा उल्लेख करण्यात आला आहे. "ग्लोबल यूथ तोबाको सर्वेक्षण (GYTS) 2019 नुसार 13 ते 15 वयोगटातील साधारण 8.5 टक्के मुलं ही वेगवेगळ्या माध्यमातून तंबाखूचे सेवन करतात. यात विशेष चिंतेची बाब म्हणजे दररोज साधारण 5500 लहान मुलं तंबाखुचे सेवन करतात," असे या निवेदनात म्हणण्यात आले आहे.

फ्री एज्यूकेशनल इन्स्टिट्यूशन (ToFEI) म्यॅन्यूअलचे महत्त्व सांगितले

साधारण 55 टक्के तरूणांना वयाच्या 20 वर्षांआधीच तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन लागते, असेही सरकारने दिलेल्या सूचनेत म्हटले आहे. तसेच तंबाखूमुक्त धोरणाच्या अंमलबजावणीच्या महत्त्वावरही या सूनचेत जोर देण्यात आला आहे. तंबाखू फ्री एज्यूकेशनल इन्स्टिट्यूशन (ToFEI) म्यॅन्यूअलचे महत्त्वही या सूचनेत सांगण्यात आले आहे. शैक्षणिक संस्था ToFEI म्यूनअलच्या मदतीने  तंबाखूविरोधी धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करू शकतात, असंही या सूचनेत म्हणण्यात आलं आहे. केंद्र सरकारने 31 मे म्हणजेच तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने सोशिओ इकोनॉमिक एज्यूकेशनल डेव्हलपमेंट सोसायटीच्या सहकार्याने ToFEI धोरण जारी केले होते.   

हेही वाचा :

World No Tobacco Day 2024 : तंबाखू खाणाऱ्यांनो वेळीच थांबवा! 'हे' जीवघेणे आजार झाल्याचे समजले, तर पायाखालची जमीन सरकेल

Pune News : समोसामध्ये बटाट्याऐवजी कंडोम, दगड आणि तंबाखू ; पुण्यातील किळसवाण्या प्रकाराने खळबळ

Tobacco : सरकार कितीही जाहिराती करू दे, लोकांचा पान-तंबाखू-गुटख्यावरील खर्चाचा आलेख वाढताच; मोठा हिस्सा व्यसनावर खर्च

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Ajit Pawar Rohit Pawar meet : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : ईव्हीएमसंदर्भात संजय राऊतांकडून शंका व्यक्त; म्हणाले आमच्याकडे  450 तक्रारीAjit Pawar Full PC : टायमिंग जुळलं नाही; शरद पवारांचेही आशीर्वाद घेतले असते - अजित पवारRohit Pawar on Ajit Pawar Meeting : अजित दादांचं 'ते' वक्तव्य; रोहित पवारांची कबुलीTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Ajit Pawar Rohit Pawar meet : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
Embed widget