एक्स्प्लोर
CBSE Results : पुन्हा मुलींचीच बाजी, 499 गुणांसह हंसिका शुक्ला आणि करिष्मा अरोरा पहिल्या
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) 12 वीच्या परीक्षेचा आज (गुरुवार, 02 मे) निकाल जाहीर करण्यात आला आहे. सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स या तीनही शाखांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) 12 वीच्या परीक्षेचा आज (गुरुवार, 02 मे) निकाल जाहीर करण्यात आला आहे. सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स या तीनही शाखांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी 499 गुण मिळवत दोन विद्यार्थीनी देशात पहिल्या आल्या आहेत. डीपीएस गाजियाबादची विद्यार्थीनी हंसिका शुक्ला आणि मुजफ्फरनगरमधील एसडी पब्लिक स्कूलची विद्यार्थीनी करिष्मा अरोरा या दोघींनी 499 गुण मिळवले आहेत. सीबीएसईच्या परिक्षेला बसलेले विद्यार्थी cbse.nic.in या संकेतस्थळावर जाऊन स्वतःचा निकाल पाहू शकतात.
दुसऱ्या क्रमांकावर तीन मुली आहेत. यामध्ये हरियाणाची भाव्या, ऋषिकेशमधील गौरंगी चावला आणि रायबरेली येथील ऐश्वर्या या तिघींनी संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावला आहे.
सीबीएसई परीक्षेचा निकाल 83.4 टक्के इतका लागला आहे. सीबीएसईचा विभागवार निकाल पाहिला तर त्रिवेंद्रम विभागाचा पहिला क्रमांक लागतो. त्रिवेंद्रम विभागाचा निकाल 98.4 टक्के इतका लागला आहे. त्याखालोखाल चेन्नई विभागाचा क्रमाक आहे. चेन्नई विभागाचा निकाल 91.87 इतका आहे. (चेन्नई विभागात महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला आहे) मुलींचा निकाल हा मुलांपेक्षा 9 ट्कके चांगला असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
पहिला क्रमांक मिळवणाऱ्या हंसिकाने एबीपी न्यूजशी बातचित करताना सांगितले की, तिला सायकॉलॉजी, इतिहास, म्युझिक वोकल आणि पॉलिटिकल विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत, तर इंग्रजीमध्ये तिला 99 गुण मिळाले आहेत. विशेष बाब म्हणजे हंसिकाने कोणत्याहा खासगी क्लासेस अथवा शिकवणीशिवाय पहिला क्रमांक पटकावला आहे. हंसिकाला आयएफएस अधिकारी व्हायचे आहे. हंसिकाचे वडील राज्यसभा सचिवालयात काम करतात आणि तिच्या आई प्राध्यापिका आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
