CBSE result | अद्याप निकालाची तारीख जाहीर नाही; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सीबीएसई बोर्डाचे आवाहन
सीबीएसई बोर्डाच्या (CBSE) इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या निकालाची तारीख जाहीर झाल्याच्या बातम्या काही वेबसाईटवर प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, अद्याप निकालाची तारीख जाहीर झाली नसल्याचं सीबीएसई बोर्डाने सांगितलं आहे.
नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या (CBSE) इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या निकालाची तारीख जाहीर झाल्याच्या बातम्या काही वेबसाईटवर प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, अद्याप निकालाची तारीख जाहीर झाली नसल्याचं सीबीएसई बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन बोर्डाने केलं आहे. काही वेबसाईट वर 18 जुलै 12 वीच्या वर्गाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर 10 वी इयत्तेचा निकाल 15 ते 17 जुलैदरम्यान जाहीर करण्यात येणार असल्याचं प्रसिद्ध करण्यात आलं होतं.
केंद्रीय माध्यमिक शिक्षा परिषदने (CBSE) अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करत अद्याप बोर्डाकडून निकालाची कोणतीही तारीख जाहीर केली नसल्याचं सांगितलं आहे. सीबीएसईद्वारा निकालाची माहिती अधिकृत संकेतस्थळ cbseresults.nic.in यावर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या वेबसाईटवर चेक करण्यास सांगितले आहे.
CBSE | सीबीएसई बोर्डानंतर नंतर राज्य मंडळ अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेणार का?
नववी ते बारावीसाठीचा अभ्यासक्रम 30 टक्के कमी करण्याचा निर्णय कोरोना व्हायरस संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सीबीएसई बोर्डने 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेज बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमाचा भार येऊ नये यासाठी सीबीएसई इयत्ता 9 ते 12 चा अभ्यासक्रम 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी 30 टक्के कमी करणार असून महत्त्वाच्या विषयांच्या कन्स्पेट अभ्यासक्रमात राहणार आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. नॅशनल काउंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (एनसीईआरटी) सीबीएसई बोर्डला सुधारित अभ्यासक्रम तयार करण्यास मदत केली आहे. कोरोनाच्या संसर्ग वाढत असताना ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे. त्यात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करता यावा व विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी महत्वाचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे.
UGC Guidelines | UGC चा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, उदय सामंत यांची टीका