सोन्याच्या खरेदीत भारताचा विक्रम! चीनला मागे टाकत रचना नवा इतिहास, नेमकी किती केली सोन्याची खरेदी?
सणासुदीच्या काळात भारतीय बाजारपेठेत प्रचंड व्यवसाय होत आहे. सोने खरेदीत (Buying Gold) भारताने चीनला (China) मागे टाकले आहे. गेल्या 3 महिन्यांत भारतीयांनी चीनपेक्षा 51 टक्के अधिक सोन्याची खरेदी केलीय.
Buying Gold : सणासुदीच्या काळात भारतीय बाजारपेठेत प्रचंड व्यवसाय पाहायला मिळत आहे. सोने खरेदीत (Buying Gold) भारताने चीनला (China) मागे टाकले आहे. . गेल्या तीन महिन्यांत भारतीयांनी चीनपेक्षा 51 टक्के अधिक सोन्याची खरेदी केली आहे. जुलै ते सप्टेंबर 2024 या तिमाहीत भारतीयांनी 248.3 टन सोन्याची खरेदी करुन एक नवीन विक्रम केला आहे.
सोन्याच्या मागणीत 18 टक्क्यांची वाढ
यंदाच्या सणासुदीच्या काळात भारतीय सोन्याच्या बाजारात सोन्याला कमालीची झळाळी पाहायला मिळत आहे. सोन्याच्या खरेदीत भारताने चीनलाही मागे टाकले आहे. गेल्या तीन महिन्यांत भारतीयांनी चीनपेक्षा 51 टक्के अधिक सोने खरेदी केले आहे. जुलै-सप्टेंबर 2024 या तिमाहीत भारतीयांनी 248.3 टन सोने खरेदी केले, जे या काळात चीनमध्ये खरेदी केलेल्या सोन्याच्या तुलनेत 51 टक्के अधिक आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतीयांनी नाण्याच्या स्वरुपात सर्वाधिक सोने खरेदी केले आहे. त्याच वेळी, जुलै-सप्टेंबरमध्ये भारतातील सोन्याच्या मागणीत वर्ष-दर-वर्ष आधारावर 18 टक्क्यांनी वाढली आहे.
Google, Meta, Amazon आणि Flipkart ने जाहिरातींच्या उत्पन्नातून केली 60000 कोटींची कमाई
दुसरीकडे, टेक आणि ई-कॉमर्सच्या मोठ्या व्यावसायिक घराण्यांनी चालू आर्थिक वर्षात जाहिरात महसुलात मोठी कमाई केली आहे. उदाहरणार्थ, Google, Meta, Amazon आणि Flipkart ने जाहिरातींच्या उत्पन्नातून 60,000 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 टक्के वाढ दर्शवते. रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (आरओसी) यांनीही याला दुजोरा दिला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये ते 55,053 कोटी रुपये होते. प्रथमच, Google आणि Meta च्या भारतीय हातांनी एकत्रित एकूण महसूल 50,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
गुंतवणूकदारांची संपत्ती 453 लाख कोटी रुपये
गेल्या दिवाळीच्या तुलनेत यंदा भारतीय गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे. शेअर बाजाराच्या नकारात्मक प्रतिसादानंतरही भारतीय गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 453 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. केंद्रातील मोदी सरकारची स्थिरता हे त्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. भू-राजकीय स्थिती, निवडणुकीच्या हालचाली आणि चांगला मान्सून ही यामागची प्रमुख कारणे आहेत. स्थिरतेमुळे चांगले परिणाम दिसून येतील, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. सध्या देशात सणांचा हंगाम सुरु आहे. या काळात सोन्या चांदीच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे. एका बाजुला मागणी वाढत असताना दरात देखील तेजी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच अनेकजण गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी करण्याचा निर्णय गेत आहेत.