Bundelkhand Expressway : मोदी-योगींनी उद्घाटन केलेल्या बुंदेलखंड एक्स्प्रेस-वेला 5 दिवसातच भला मोठा खड्डा!
Bundelkhand Expressway : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाच दिवसांपूर्वी बुंदेलखंड एक्स्प्रेस-वेचं (Bundelkhand Expressway) उद्घाटन केले.
Bundelkhand Expressway : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाच दिवसांपूर्वी बुंदेलखंड एक्स्प्रेस-वेचं (Bundelkhand Expressway) उद्घाटन केले. पण फक्त पाच दिवसांमध्येच या एक्स्प्रेस वेवर मोठा खड्डा पडलाय. एक्स्प्रेस-वेवर दोन फूटाचा खड्डा पडलाय. तात्काळ जेसीबी बोलवत एक्स्प्रेस वे दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर सोशल मीडियावर याचीच चर्चा सुरु झाली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. नेटकरी या एक्स्प्रेस वेच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. बुंदेलखंड एक्स्प्रेस-वे अवघ्या 28 महिन्यात तयार झाला आहे.
उद्धघाटनच्या पाचव्या दिवशी जालौन परिसरात छिरिया सलेमपूरजवळ बुंदेलखंड एक्स्प्रेस वेची रस्ता खचला. धक्कादायक म्हणजे, पाच दिवसांत या हायवेवर चार जणांच्या मृत्यूची नोंदही झाली आहे. बुधवारी रात्री दुचाकी आणि कार यांचा भीषण अपघात झाला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी एक्स्प्रेस वेच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.
जिस बुंदेलखंड एक्सप्रेसवे का PM @narendramodi जी, ने मात्र 4 दिन पहले उद्धाटन किया था आज वह पाताललोक में धंस गया। इस एक्सप्रेसवे के निर्माण के बाद प्रचार पर करोड़ों रुपए खर्च हुए थे। देशभर के बीजेपी विधायक, सांसद, मंत्री और पत्रकारों ने ट्विट किए थे। pic.twitter.com/vGuch4m3G7
— Shahid Misbahi (@Shahid_Misbahii) July 21, 2022
@PMOIndia पहली बारिश नहीं झेल पाया बुंदेलखंड एक्सप्रेसवे, 4 दिन पहले पीएम मोदी ने किया था उद्घाटन @AAPHaryana @ArvindKejriwal @BhagwantMann @DrSushilKrGupta @raghav_chadha @msisodia @anuragdhanda @prabhakarg_aap @SandeepPathak04 #ArvindKejriwal #Vs #Modi pic.twitter.com/k74OD3YVop
— वक़ील नवीन कुमार "दूबलधन" (@NvnAdvocate) July 21, 2022
बुंदेलखंड एक्सप्रेसवे का एक हिस्सा धंस गया.
— राजा श्रीवास्तव (@Srivastava_ji17) July 21, 2022
सिर्फ 4 दिन पहले PM ने उद्घाटन किया था. pic.twitter.com/NI3ieClr0h
लोकार्पण के पांच दिन बाद बारिश में बुंदेलखंड एक्सप्रेसवे का एक हिस्सा 2-3 फिट धंसा, अब मरम्मत का चल रहा कार्य, 2500 करोड़ रुपए में बनी है ये सड़क, महज 4-5 दिन पहले ही पीएम मोदी ने इसका किया था उद्घाटन@PMOIndia@UPGovt@CMOfficeUP pic.twitter.com/fNqfshlH54
— विनय कुमार सिंह (रघुवंशी) (@Vinayksingh_15) July 21, 2022
बधाई हो, ये है बुंदेलखंड एक्सप्रेसवे जिसका उद्घाटन PM @narendramodi जी, ने 4 दिन पहले किया था।
— Devraj Kumar Bauddh (@DevrajKrBauddh) July 21, 2022
आज वह पाताललोक की तरफ खिसक गया, इस एक्सप्रेसवे के निर्माण के बाद प्रचार के नाम पर हजारों करोड़ों रुपए खर्च किए गए।
इसी तरह का विकास हो रहा है देश में, शर्म आनी चाहिए।
BJP नेताओं को, pic.twitter.com/w8WOHzOkaF
पहली ही बारिश में #बुंदेलखंड_एक्सप्रेसवे की सड़क धंसी, जालौन कोतवाली क्षेत्र के छिरिया सलेमपुर के पास बुंदेलखंड एक्सप्रेस वे का मामला, गावर कंपनी द्वारा बनाया गया है एक्सप्रेस वे@AwasthiAwanishK pic.twitter.com/UKanhksb3U
— Mohit Verma (@MohitVermaNews) July 21, 2022
नकल तो हमारी कर लोगे अकल कहा से लाओगे जुमलेबाज मोदी सरकार !!
— Vivek Yadav (@VivekYa03632052) July 21, 2022
बुंदेलखंड एक्सप्रेसवे का एक हिस्सा धंस गया,
सिर्फ 4 दिन पहले PM ने उद्घाटन किया था।।
इसका भी वही हाल है,जो पूर्वांचल एक्सप्रेस वे का है।।
आधे अधूरे,घटिया काम को जल्दीबाजी में फीता काटना।@yadavakhilesh pic.twitter.com/PEIxQ7Tr9j
यूपीईआयडीए अर्थात उत्तर प्रदेश द्रुतगती महामार्ग औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या देखरेखीखाली सुमारे 14,850 कोटी रुपये खर्चाच्या या चौपदरी 296 किलोमीटर लांबीच्या द्रुतगती महामार्गाची उभारणी करण्यात आली आहे. पुढील काळात या महामार्गाचा विस्तार करून हा मार्ग सहापदरी देखील करता येऊ शकेल. हा द्रुतगती महामार्ग चित्रकूट जिल्ह्यातील भरतकूपजवळील गोंडा गावातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 35 पासून इटावा जिल्ह्यातील कुद्रैल गावापर्यंत आहे आणि या गावाजवळ हा महामार्ग आग्रा-लखनौ द्रुतगती महामार्गाला जाऊन मिळतो. हा द्रुतगती महामार्ग चित्रकूट, बांदा, महोबा,हमीरपुर, जालौन, ऑरैय्या आणि इटावा या सात जिल्ह्यांमधून जातो.
महामार्गाच्या बांधकामासाठी 14,850 कोटी रुपये खर्च
296 किमी परिसरात पसरलेल्या या एक्स्प्रेसवेमुळे आता दिल्ली ते चित्रकूटपर्यंतचा वेळ जवळपास निम्म्याने कमी होणार आहे. जिथे आधी 12 ते 14 तास लागायचे तिथे आता हे अंतर 6 तासात पूर्ण होणार आहे. या एक्स्प्रेस वेची जमीन खरेदी करण्यासाठी 2200 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून बांधकामासाठी 14,850 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एक्स्प्रेस वेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे यात 15 हून अधिक उड्डाणपूल, 10 हून अधिक मोठे पूल, 250 हून अधिक छोटे पूल, 6 टोल प्लाझा आणि चार रेल्वे पूल आहेत.