Union Budget 2021: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय? कृषीसाठी 16.5 लाख कोटींची अर्थमंत्र्यांकडून घोषणा
Union Budget 2021-22: Agriculture Budget : कृषि क्षेत्रासाठी देखील मोठी तरतूद केली असल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे. यावेळी आपल्या भाषणात अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असल्याचा पुनरुच्चार देखील केला.
Union Budget 2021-22: आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपला सलग तिसरा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात आरोग्य, सार्वजनिक वाहतूक, रेल्वे, शहरांचा विस्तार यावर भरीव तरदूत करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. यासोबतच कृषि क्षेत्रासाठी देखील मोठी तरतूद केली असल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे. यावेळी आपल्या भाषणात अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असल्याचा पुनरुच्चार देखील केला. कृषी सेक्टरसाठी 16.5 लाख कोटी रुपयांच्या निधीची घोषणा त्यांनी केली. मागील वर्षी ही रक्कम 15 लाख कोटी रुपये होती.
Budget 2021 : विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांवर योजनांची खैरात, महाराष्ट्रासाठी काय?
केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना आमचं सरकार शेतकऱ्यांना समर्पित असल्याचं सांगत हमीभावाबद्दल भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, आमचं सरकार शेतकऱ्यांना समर्पित आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेनं काम करत आहे. युपीए सरकारच्या तुलनेत तीन टक्के जास्त निधी मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. प्रत्येक क्षेत्रातील शेतकऱ्याला मोदी सरकारकडून मदत दिली गेली, असं त्या म्हणाल्या.
Budget 2021 PDF Documents Online: अर्थसंकल्पाचे PDF डॉक्युमेंट कुठे आणि कसं डाऊनलोड कराल?
त्या म्हणाल्या की, तांदूळ, गहू, दाळीसह इतर शेतमालांच्या हमीभावात वाढ करण्यात आली. शेतमालाच्या खरेदीला आणखी वाढवण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे. 2021-22 या आर्थिक वर्षांसाठी कृषी कर्जाचं उद्दिष्ट 16.6 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं आहे. त्याचबरोबर 1 हजार कृषी बाजार ‘ई-नाम’शी जोडण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 40 हजार कोटीपर्यंत निधी वाढवण्यात आला आहे. त्याचबरोबर सुक्ष्म जलसिंचनासाठी निधी दुप्पट करण्यात आला आहे, असं त्या म्हणाल्या.
Budget 2021: पेट्रोल डिझेलवर कृषी अधिभार! सर्वसामान्य ग्राहकाला फटका बसणार नसल्याचा दावा!
अर्थमंत्री म्हणाल्या की, स्वामित्व योजना देशभरात लागू करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी ऑपरेशन ग्रीन स्कीम योजनेची घोषणा केली. यात अनेक पिकांचा समावेश करण्यात येईल आणि शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवला जाईल. हमीभावामध्ये मोठा बदल झाला आहे. 2012 मध्ये शेतकऱ्यांना हमीभावापोटी 33 हजार कोटी रुपये देण्यात आले होते. 2015 मध्ये शेतकऱ्यांना 25 हजार कोटी रुपये दिले गेले. फक्त गव्हाचं उत्पादन घेणाऱ्या 43 लाख शेतकऱ्यांना 2020 -21 मध्ये 75 हजार कोटी रुपये हमीभावापोटी देण्यात आले, असं त्यांनी सांगितलं.