Brij Bhushan Sharan Singh: देशात कुस्तीसाठी मी जे काही केलंय, ते इतिहासात लिहिलं जाईल; बृजभूषण शरण सिंह यांनी थेटच सांगितलं
Brij Bhushan Sharan Singh: WFI चे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी हरियाणात बोलताना अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर भाष्य केलं आहे.
![Brij Bhushan Sharan Singh: देशात कुस्तीसाठी मी जे काही केलंय, ते इतिहासात लिहिलं जाईल; बृजभूषण शरण सिंह यांनी थेटच सांगितलं Brij bhushan sharan singh slams bhupinder singh hooda deepender singh hooda said on indian wrestling history WFI Wrestler Protest Brij Bhushan Sharan Singh: देशात कुस्तीसाठी मी जे काही केलंय, ते इतिहासात लिहिलं जाईल; बृजभूषण शरण सिंह यांनी थेटच सांगितलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/28/2e7cf9f4e650d98f3538bac04c44dc1a1693227600069129_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Brij Bhushan Sharan Singh News: डब्ल्यूएफआयचे (Wrestling Federation of India) माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी काँग्रेस नेते भूपेंद्र हुड्डा (Bhupinder Hooda) आणि दीपेंद्र हुडा यांच्यावरील आरोपांवर निशाणा साधला. हरियाणातील रोहतकमध्ये बोलताना ते म्हणाले की, हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात पोहोचलं असून आम्ही न्यायालयाच्या कामकाजावर भाष्य करू शकत नाही.
एएनआयशी बोलताना माजी WFI अध्यक्ष बृजभूषण सिंह म्हणाले की, "माझ्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत. पोलिसांनी माझ्याविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्राला मी आव्हान दिलं आहे. माझ्यावरील हा आरोप दीपेंद्र हुड्डा आणि भूपेंद्र हुड्डा यांनी प्रायोजित केला आहे, ज्यामध्ये काही व्यावसायिकदेखील सामील आहेत. त्यांना त्यांच्या अटींवर कुस्ती चालवायची होती, पण मी त्यांचं ऐकलं नाही."
#WATCH | Rohtak, Haryana: Former WFI president and BJP MP Brij Bhushan Sharan Singh says, "The whole matter has reached the Court and we cannot comment on the workings of the court... The charge is not framed on me... The police have submitted a chargesheet and I have challenged… pic.twitter.com/8tHGNfSiHy
— ANI (@ANI) September 27, 2023
कुस्तीपटूंच्या प्रशिक्षणाबाबत काय म्हणाले बृजभूषण सिंह?
भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनीही भारतातील कुस्तीच्या दर्जाबाबत वक्तव्य केलं. ते पुढे म्हणाले की, एक काळ असा होता की, कुस्तीमध्ये भारताची स्थिती चांगली नव्हती, पण आज भारत कुस्ती या खेळात चांगली कामगिरी करत आहे. आपण आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकं मिळवू, पण आपली कामगिरी पूर्वीसारखी असेल, असं मला वाटत नाही, कारण गेल्या 9 महिन्यांत कुस्तीपटूंनी ना कोचिंग घेतलीये ना खेळ नीट खेळला."
दीपेंद्र हुड्डा आणि भूपेंद्र हुड्डा यांच्यावर निशाणा साधला
भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह म्हणाले की, "या कुस्तीपटूंनी न्यायालय आणि संसदेपेक्षा स्वतःला वरचढ समजण्यास सुरुवात केली आहे. दीपेंद्र हुड्डा, भूपेंद्र हुड्डा तसेच काही उद्योगपती त्यांच्या कामगिरीच्या मागे आहेत. भारताच्या कुस्तीसाठी मी जे काही बोललो. त्यासाठी माझं नाव आहे. भारतीय कुस्तीच्या इतिहासात लिहिलं जाईल. मी याआधीही म्हटलं आहे की, माझ्यावरील आरोप सिद्ध झाले तर मी फासावर लटकायला तयार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)