एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा अल्प परिचय
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे आज रात्री कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असल्याची माहिती सायंकाळी 7 वाजता गोवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली होती.
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे आज रात्री कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असल्याची माहिती सायंकाळी 7 वाजता गोवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पर्रिकर यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आज सकाळी मनोहर पर्रीकर यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात आले होते.
मनोहर पर्रिकर यांचा अल्प परिचय
संपूर्ण नाव : मनोहर गोपाळकृष्ण पर्रिकर
गोव्यातल्या म्हापसामध्ये 13 डिसेंबर 1955 रोजी जन्म
लोयोला हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण
मुंबईतील आयआयटीमधून मेटलर्जीमध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण (पर्रिकर भारतातले पहिले आयआयटीयन जे आमदार झाले आणि पहिले आयआयटीयन जे एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री झाले, उच्चशिक्षीत मुख्यमंत्री)
विद्यार्थीदशेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत
1994 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले
2001 मध्ये त्यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले
त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये (2001) ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. परंतु त्यांचं सरकार केवळ दीड वर्ष टिकले
जून 2002 मध्ये पर्रिकर पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले
2000-2005, 2012-2014 आणि 2017-2019 गोव्याचे मुख्यमंत्री राहिले
पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचं नाव सर्वात पहिल्यांदा पर्रिकरांनी सुचवलं
2014 मध्ये भाजपने देशात सत्ता मिळवली. पर्रिकरांनी देशाच्या संरक्षण मंत्रीपदाची शपथ घेतली.
पर्रिकर संरक्षणमंत्री असताना उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला
गोव्यात भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी 2017 मध्ये पर्रिकरांनी संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आणि 13 मार्च 2017 मध्ये पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
2018 मध्ये पर्रिकरांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे उघड झाले
आज सकाळी पर्रिकरांची प्रकृती अत्यंत खालावली होतीExtremely sorry to hear of the passing of Shri Manohar Parrikar, Chief Minister of Goa, after an illness borne with fortitude and dignity. An epitome of integrity and dedication in public life, his service to the people of Goa and of India will not be forgotten #PresidentKovind
— President of India (@rashtrapatibhvn) March 17, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
क्रीडा
निवडणूक
Advertisement