Morning Headlines 29th June : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
विनापरवानगी रहिवासी संकुलात कुर्बानी देणं चुकीचंच, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निर्देश
विनापरवानगी रहिवासी संकुलात कुर्बानी देणं चुकीचंच, असं मत व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं बकरी ईदच्या पूर्वसंध्येला हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. राज्य सरकारसह पालिका प्रशासनला याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देत सदर प्रकरणी पालिकेला नागपाडा पोलीसांच्या मदतीनं तातडीनं कारवाई करत योग्य तो बंदोबस्त देण्याचे निर्देश जारी केले. (वाचा सविस्तर)
देशातील बहुतांश राज्यात मुसळधार पाऊस, उद्यापर्यंत जोर कायम राहणार; वाचा हवामान विभागाचा अंदाज
देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. सध्या सुरु असलेल्या पावसामुळं नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळं वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. तर डोंगराळ भागात पावसामुळं नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. (वाचा सविस्तर)
समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर मोदी सरकारला मोठा पाठिंबा, आम आदमी पक्षाकडून तत्वत: समर्थन, पण...
समान नागरी कायदा (Uniform Civil Code) लागू करण्याबाबत चर्चा सुरु असतानाच मोदी सरकारला या मुद्द्यावर आम आदमी पक्षाचा पाठिंबा मिळत असल्याचं दिसत आहे. आम आदमी पक्षाने (Aam Adami Party) समान नागरी कायद्याचं तत्वत: समर्थन केलं आहे. सर्व धर्मांशी चर्चा करुन सहमतीनेच हा कायदा करण्यात यावा, असं आम आदमी पक्षाचे सरचिटणीस संदीप पाठक म्हणाले. (वाचा सविस्तर)
Chandrayaan-3 : भारताच्या महत्त्वकांक्षी चंद्र मोहिमेबाबत मोठी अपडेट, चांद्रयान-3 या दिवशी होणार प्रक्षेपित
चांद्रयान-3 (Chandrayaan-3) या चांद्रयानाच्या प्रक्षेपणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. चांद्रयान-3 चे प्रक्षेपण जुलै महिन्याच्या मध्यात होईल, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं आहे. इस्रो बुधवारी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.(वाचा सविस्तर)
राहुल गांधीची 'मोहब्बत की दुकान', राहुल गांधीची मेकॅनिक्सच्या कार्यशाळेला भेट, गॅरेजमध्ये काम करतानाचे फोटो व्हायरल
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) लोकांमध्ये जात आहेत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत. अनेकदा लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत असतात. कधी ते विद्यार्थ्यांना भेटतात तर कधी बाजारात दिसतात. आता राहुल गांधींनी मंगळवारी दिल्लीतील करोलबाग येथील मोटरसायकल मेकॅनिक्सच्या कार्यशाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांच्याशी संवादही साधला. (वाचा सविस्तर)
अमरनाथ यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात, यात्रेकरूंसाठी 100 खाटांच्या दोन रुग्णालयांचं उद्घाटन
पवित्र अमरनाथ यात्रा 1 जुलैपासून सुरू होत आहे. यंदाही अमरनाथ यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. अमरनाथ यात्रेकरुंच्या (Amarnath Yatra 2023) सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज झालं आहे. जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या हस्ते भाविकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी दोन रुग्णालयांचे उद्घाटन करण्यात आलं आहे. (वाचा सविस्तर)
महान सांख्यिकीशास्त्रज्ञ पीसी महालनोबिस यांचा जन्म, Apple कंपनीचा पहिला iPhone बाजारात आणला; आज इतिहासात
दरवर्षी 29 जून हा दिवस आपल्या देशात राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. सामाजिक-आर्थिक नियोजन आणि धोरण निर्मितीमध्ये सांख्यिकीच्या महत्त्वाबाबत आजच्या दिवशी जनजागृती केली जाते. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना दैनंदिन जीवनात आणि नियोजन आणि विकास प्रक्रियेत आकडेवारीच्या महत्त्वाची जाणीव करून देणे हा आहे. (वाचा सविस्तर)
Horoscope Today : कन्या, तूळ, धनु आणि मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, वाचा आजचं राशीभविष्य
आज वार गुरुवार दिनांक 29 जून 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. कन्या, तूळ, धनु आणि मकर राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. पाहुयात आजचा दिवस मेष ते मीन या राशींच्या लोकांसाठी कसा राहिल. (वाचा सविस्तर)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
