(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BrahMos Missiles to Philippines : प्रथमच ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात; पहिली खेप फिलिपाइन्सकडे सुपूर्द, दक्षिण चीन समुद्रात तैनात करण्यात येणार
दक्षिण चीन समुद्रात तणाव वाढत असताना फिलिपिन्सला क्षेपणास्त्र प्रणालीची डिलिव्हरी मिळाली आहे. चीनच्या धोक्याचा सामना करण्यासाठी फिलिपिन्स 3 ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली तटीय भागात तैनात करणार आहे.
BrahMos Missiles to Philippines : भारताने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी आज(19 एप्रिल) फिलिपाइन्सला सुपूर्द केली. ब्राह्मोस मिळवणारा फिलिपिन्स हा पहिला परदेशी देश आहे. भारताने जानेवारी 2022 मध्ये फिलिपिन्सला ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या विक्रीसाठी $375 दशलक्ष (3130 कोटी रुपये) च्या करारावर स्वाक्षरी केली होती. भारतीय वायुसेनेने C-17 ग्लोब मास्टर विमानाद्वारे ही क्षेपणास्त्रे फिलिपाइन्स मरीन कॉर्प्सकडे सुपूर्द केली. या क्षेपणास्त्रांचा वेग 2.8 मॅक आणि पल्ला 290 किमी आहे. One Mach म्हणजे ध्वनीचा वेग 332 मीटर प्रति सेकंद. फिलिपिन्सला सोपवण्यात आलेल्या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा 2.8 पट जास्त आहे.
#WATCH | BrahMos supersonic cruise Missiles delivered to the Philippines by India today. The two countries had signed a deal worth USD 375 million in 2022. pic.twitter.com/CLdoxiChb5
— ANI (@ANI) April 19, 2024
दक्षिण चीन समुद्रात तणाव वाढत असताना फिलिपिन्सला क्षेपणास्त्र प्रणालीची डिलिव्हरी मिळाली आहे. चीनच्या धोक्याचा सामना करण्यासाठी फिलिपिन्स 3 ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली तटीय भागात (दक्षिण चीन समुद्र) तैनात करणार आहे. ब्रह्मोसच्या प्रत्येक प्रणालीमध्ये दोन क्षेपणास्त्र प्रक्षेपक, एक रडार आणि कमांड आणि कंट्रोल सेंटर आहे. याद्वारे पाणबुडी, जहाज, विमानातून 10 सेकंदात दोन ब्रह्मोस क्षेपणास्त्रे शत्रूवर डागली जाऊ शकतात. याशिवाय भारत फिलीपिन्सला क्षेपणास्त्र चालवण्याचे प्रशिक्षणही देणार आहे.
फिलिपिन्सने ब्रह्मोस क्षेपणास्त्रे का खरेदी केली?
अलीकडेच दक्षिण चीन समुद्रात फिलिपिन्सची चीनसोबत अनेक चकमकी झाल्या आहेत. ब्रह्मोस क्षेपणास्त्रांमुळे समुद्रात फिलिपिन्सची ताकद वाढेल आणि समुद्रात चीनचा वाढता प्रभावही रोखला जाईल.
कराराचा भारताला फायदा
फिलीपिन्ससोबतच्या या करारामुळे देशाला संरक्षण क्षेत्रात निर्यातदार बनवण्यात आणि आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देण्यासाठी मदत होईल. या करारामुळे लष्करी उद्योगाचे मनोबलही उंचावेल आणि दक्षिण-पूर्व आशियातील एक विश्वासार्ह निर्यातदार म्हणूनही भारताकडे पाहिले जाईल. तसेच, या करारामुळे भारत-फिलीपिन्स संबंध अधिक दृढ होतील आणि चीनला दोन्ही देशांमधील एकतेचा संदेश जाईल.
अर्जेंटिना-व्हिएतनाममध्येही ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मागणी
ब्रह्मोस एरोस्पेसचे महासंचालक अतुल दिनकर राणे यांनी जून 2023 मध्ये सांगितले होते की, अर्जेंटिना, व्हिएतनामसह 12 देशांनी ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे. ब्रह्मोसला बाहेरील देशांतून मागणी आल्याने ही क्षेपणास्त्र यंत्रणा अत्यंत विश्वासार्ह असल्याचे दिसून येते.
इतर महत्वाच्या बातम्या