Bomb Threat to Tirupati Temple: दहशतवाद्यांच्या निशाण्यावर तिरुपती मंदीर? धमकीच्या ईमेलनं देशभरात खळबळ
Bomb Threat: मंदिर प्रशासनानं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ईमेलमध्ये ISIS चे दहशतवादी मंदिर उडवून देतील, असं नमूद करण्यात आलं आहे.
Bomb Threat to Tirupati ISKCON Temple: गेल्या दोन आठवड्यात सातत्यानं विमान कंपन्यांना विमानं बॉम्बनं उडवून देण्याच्या धमक्या मिळत होत्या. अशातच आत तिरुपती मंदिरावर बॉम्बस्फोट करण्याची धमकी ईमेलमार्फत आल्याची माहिती समोर आली आहे. तिरुपतिच्या इस्कॉन मंदिराला बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिती मिळत आहे. रविवारी, 27 ऑक्टोबर 2024 रोजी ईमेलद्वारे धमकी आली होती. मंदिर प्रशासनानं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ईमेलमध्ये ISIS चे दहशतवादी मंदिर उडवून देतील, असं नमूद करण्यात आलं आहे.
धमकीचा ईमेल आल्याची माहिती मिळताच तिरुपती पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मंदिराची झडती घेतली. स्फोटकांचा तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांनी बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं. मात्र, मंदिर परिसरातून कोणतीही स्फोटकं किंवा अन्य कोणतीही आक्षेपार्ह वस्तू सापडलेली नाही.
तीन दिवसांत चौथ्यांदा धमकी...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा ईमेल पाठवणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले जात आहेत. हा ईमेल खोटा असल्याचा पोलिसांना संशय आहे. गेल्या तीन दिवसांत तिरुपती मंदिराच्या ईमेलवर आलेला हा चौथा मेल आहे. यापूर्वीच्या ईमेलमध्येही मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. याआधी शनिवारी दोन हॉटेलांना बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाली होती, जी नंतर बनावट असल्याचं निष्पन्न झालं. या घटनेपूर्वीही शहरातील अन्य तीन हॉटेलांना बॉम्बनं उडवण्याच्या धमक्या आल्या होत्या. सततच्या धमक्यांमुळे लोक भयभीत झाले आहेत.
धमकीच्या ईमेलमध्ये नेमकं लिहिलंय काय?
मंदिर प्रशासनाला धाडण्यात आलेल्या नव्या धमकीच्या ईमेलमध्ये कथितरित्या ड्रग तस्करी नेटवर्क सरगना जाफर सादिकचा उल्लेख करण्यात आला होता. तामिळनाडूतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि अंमलबजावणी संचालनालयानं ज्याला यापूर्वीच अटक केली आहे.