खळबळजनक! मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानाजवळ सापडला जिवंत बॉम्ब, तपास सुरु
Punjab CM Bhagwant Mann : भगवंत मान यांच्या चंदीगढमधल्या निवासस्थानाजवळ जिवंत बॉम्ब सापडल्यानं खळबळ उडाली आहे. यानंतर लगेच विशेष पथकाला पाचारण करुन बॉम्ब डिफ्युज करण्यात आला आहे.
Punjab CM Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या घराजवळ असलेल्या हेलिपॅडजवळ सोमवारी बॉम्बचा शेल (Bomb Shell) सापडला. हा बॉम्ब शेल (Bomb Shell) आंबा बागेत पडला असल्याचे आढळून आले आहे. भगवंत मान यांच्या चंदीगढमधल्या निवासस्थानाजवळ जिवंत बॉम्ब सापडल्यानं खळबळ उडाली आहे. यानंतर लगेच विशेष पथकाला पाचारण करुन बॉम्ब डिफ्युज करण्यात आला आहे. बॉम्ब नेमका कुठून आला याबाबत अधिक तपास सुरु आहे. पोलिसांनी तत्काळ परिसराला रस्सी बांधून कव्हर केले आहे.
राजिंद्र पार्कजवळ बांधलेले हेलिपॅड पंजाब (Punjab) आणि हरियाणाचे (Haryana) मुख्यमंत्री वापरतात. आज सकाळच्या सुमारास या हेलिपॅडजवळ बॉम्ब शेल सापडल्यानं खळबळ उडाली. यानंतर लगेचच बॉम्ब निकामी पथकाला पाचारण करण्यात आले असून चंदीगड पोलीस तपास करत आहेत. सीएम हाऊसजवळ बॉम्बचा शेल सापडणे हेही मोठे षडयंत्र मानले जात आहे.
Bomb found near Punjab CM Bhagwant Mann's house in Chandigarh
— ANI Digital (@ani_digital) January 2, 2023
Read @ANI Story | https://t.co/D01SNrQn3W#BhagwantMann #PunjabCM #Chandigarh pic.twitter.com/QNDYaAPBvI
>
मुख्यमंत्री भगवंत मान घरी नव्हते
या प्रकरणी भारतीय लष्करानं वेस्टर्न कमांडला देखील चौकशीची जबाबदारी दिली आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि हेलिपॅडजवळील आंब्याच्या बागेत दुपारी साडेचार ते साडेचारच्या सुमारास एका ट्यूबवेल ऑपरेटरला हा बॉम्ब दिसला. या काळात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे त्यांच्या निवासस्थानी नव्हते. चंदीगड प्रशासनाने म्हटले आहे की, संरक्षण दल बॉम्ब कुठून आला आहे, याचा तपास करतील आणि तो तिथं कसा आला हे पोलीस शोधून काढतील.
सैन्य दलाला पाचारण
आपत्ती व्यवस्थापन चंदीगडचे नोडल अधिकारी संजीव कोहली यांनी सांगितले की, एक बॉम्ब जप्त करण्यात आला आहे. पोलिस आणि बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने तो डिफ्युज करण्यात आला आहे. यानंतर लष्कराच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. बॉम्ब इथपर्यंत कसा आला याची चौकशी केली जात आहे. याबाबत वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे. परिसराची नाकेबंदी करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे, असं संजीव कोहली यांनी सांगितलं.
ही बातमी देखील वाचा