एक्स्प्लोर
पुलवामातून अपहृत जवानाचा मृतदेह सापडला, दहशतवाद्यांकडून हत्या
औरंगजेब असं या जवानाचं नाव आहे. पुलवामातील गुसू या भागातून औरंगजेब यांचा मृतदेह आढळून आला.
![पुलवामातून अपहृत जवानाचा मृतदेह सापडला, दहशतवाद्यांकडून हत्या body of abducted army soldier recovered in pulwama village पुलवामातून अपहृत जवानाचा मृतदेह सापडला, दहशतवाद्यांकडून हत्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/06/14225752/army.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामातून अपहरण केलेल्या भारतीय जवानाची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. औरंगजेब असं या जवानाचं नाव आहे. पुलवामातील गुसू या भागात औरंगजेब यांचा मृतदेह आढळून आला.
औरंगजेब हे हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर समीर टायगरला कंठस्नान घातलेल्या कमांडो ग्रुपचा सदस्य होते.
औरंगजेब हे 44 राष्ट्रीय रायफल्सचे जवान असून त्यांची पोस्टिंग 44RR शादीमार्गमध्ये होती. ईदच्या सुट्टीसाठी घरी परतताना, दहशतवाद्यांनी मुघल रोडवर त्यांचं अपहरण केलं. औरंगजेब हे अँटी-टेरर ग्रुपचे सदस्य आहेत.
औरंगजेब सकाळी नऊच्या सुमारास एका खासगी वाहनातून शोपियांच्या दिशेने येत होते. त्यावेळी कलमपोराजवळ अतिरेक्यांनी वाहन अडवलं आणि त्यांचं अपहरण केलं.
'रायझिंग काश्मीर'च्या संपादकांचीही हत्या
ज्येष्ठ पत्रकार आणि 'रायझिंग काश्मिर'चे संपादक शुजात बुखारी यांचीही गोळी झाडून हत्या करण्यात आली. श्रीनगरमधील वृत्तपत्र कार्यालयाबाहेर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी बुखारींवर गोळीबार केला.
इफ्तार पार्टीत सहभागी होण्यासाठी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास बुखारी हे लाल चौकातील प्रेस एन्क्लेव्हमध्ये असलेल्या कार्यालयातून निघाले होते. बुखारी गाडीत बसताना काही जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
एप्रिलमध्ये समीर टायगरचा खात्मा
दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच 30 एप्रिल रोजी जम्मू-कश्मीरच्या पुलवामामध्ये सैन्य आणि पोलिसांच्या संयुक्त ऑपरेशनमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. मृतांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर समीर टायगरचा समावेश होता.
कोण होता समीर टायगर?
समीर टायगर 2016 मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाला होता. समीर पुलवामाचा रहिवासी होता. तसंच हिजबुलच्या अनेक हल्ल्यांमध्ये तो सहभागी होता. बुरहान वाणीनंतर समीरला काश्मीरच्या पोस्टर बॉयच्या रुपात सादर करण्यात आलं होतं. समीरने दहशतवादी वसीमच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन गोळीबारही केला होता.
रमजानमुळे काश्मीरमध्ये सीजफायर
दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने रमजानच्या पार्श्वभूमीवर सीजफायरची घोषणा केली आहे. म्हणजेच दहशतवाद्यांविरोधात कारवाई बंद आहे. परंतु सीजफायरदरम्यान काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तर दिलं आहे. आजच सैन्याने बांदीपोरा जिल्ह्यामधील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. यामध्ये एक जवानही शहीद झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)