एक्स्प्लोर
दिल्लीत पोहोचताच मुख्यमंत्री थेट मोदींच्या घरी
नवी दिल्ली: राज्यात सत्ताधारी सेना-भाजपमध्ये कोंडी सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी तब्बल दीड तास दोघांमध्ये चर्चा सुरु होती. त्यामुळं या भेटीनंतर भाजप काय पावलं उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मुख्यमंत्री दिल्लीत दाखल झाल्याबरोबर पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेले.
मुख्यमंत्री आज पर्यावरण विभागाच्या बैठकांच्या निमित्ताने दिल्लीत आहेत. मात्र या बैठकीच्या निमित्ताने मुंबईतील महापौरपदाबाबतची चर्चा होणार आहे.
भाजपच्या मदतीशिवाय अन्य कुणाचंही सहकार्य घेऊन मुंबई महापालिकेचं महापौरपद मिळवायचं, असा निर्धार शिवसेनेनं केल्याचं चित्र आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील कोंडी कायम आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
याठिकाणी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांचीही भेट घेणार असल्याचं समजतंय.
भाजपच्या मदतीशिवाय अन्य कोणाचेही सहकार्य घेऊन महापौरपद मिळवायचे, हा शिवसेनेचा निर्धार असून उभयपक्षी कोंडी पुढील काही दिवस तरी कायमच राहणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांची भेट महत्त्वाची मानली जातेय.
दरम्यान, मुख्यमंत्री कोस्टल रोडसंदर्भात पर्यावरण मंत्री अनील दवेंसोबत बैठक घेणार आहेत. याशिवाय राज्यातील साखर प्रश्नाबाबत ते केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेणार आहेत.
संबंधित बातम्या
महापौरपदासाठी गट स्थापन, शिवसेनेची सावध पावलं
BMC election result : मुंबई महापालिका वॉर्डनिहाय निकालमुंबईत 30-35 जागांवर शिवसेनेला मनसे फॅक्टर महागात
शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ
मुख्यमंत्री दिल्ली दरबारी, शिवसेनेसोबतच्या कोंडीवर चर्चा? शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ दगाफटक्याची चिंता नाही, महापौर शिवसेनेचाच : अनिल परब शिवसेना-भाजप युतीसाठी मी पुढाकार घेईन: आठवले युती होणार का? आशिष शेलार म्हणतात… राज ठाकरेंच्या ‘सात’ची ‘साथ’ शिवसेनेला की भाजपला? तिसरा अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, संख्याबळ 87 युतीबाबत अजून विचार केलेला नाही, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण महापौरपदासाठी आक्रमक राहा, भाजपच्या दिल्ली मुख्यालयाचा मुंबईत फोन सेना-भाजपला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही : गडकरी ‘सामना’तील लिखाणामुळेच शिवसेना-भाजपमध्ये दरी : गडकरी मुख्यमंत्र्यांनी दूत पाठवले, आमिषं दाखवली, पण मी शिवसैनिक : सुधीर मोरेअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement