एक्स्प्लोर
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपकडून तीन व्हिडीओ रिलीज
गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून रद्द केल्याची घोषणा केली होती. त्याला आज एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भाजपने एकापाठोपाठ एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय कसा यशस्वी झाला हे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे.
नवी दिल्ली : गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून रद्द केल्याची घोषणा केली होती. त्याला आज एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भाजपने एकापाठोपाठ एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय कसा यशस्वी झाला हे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे.
भाजपकडून जो पहिला व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला, त्यात एक महिला नोटाबंदीच्या निर्णयावर आपला रोष व्यक्त करत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत शेल कंपन्यांचा एक मालक म्हणतोय की, नोटाबंदीमुळे त्याला उद्ध्वस्त केलं. तिसऱ्या व्हिडीओतून नोटाबंदीमुळे दहशतवादाचं कंबरड मोडलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे तिन्ही व्हिडीओ भाजपने नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त प्रचारासाठी तयार केले आहेत. याद्वारे नोटाबंदीचा निर्णय कसा यशस्वी झाला? हे दाखवण्याचा भाजपकडून प्रयत्न होत आहे.
या व्हिडीओद्वारे भाजपचा दावा आहे की, नोटाबंदीमुळे काश्मीरमधील दगडफेकीच्या प्रमाणात 75 टक्क्यांनी घट झाली. तर नक्षल्यांच्या हल्ल्यातही 20 टक्क्यांची घट झाली. याशिवाय या निर्णयामुळे भ्रष्ट नेते मंडळी आणि करबुडव्यांचं कंबरडं मोडलं आहे.
दरम्यान, नोटाबंदीच्य वर्षपूर्तीनिमित्त भाजपकडून देशभरात काळा पैसा विरोध दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. तर काँग्रेसकडून हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे.
व्हिडीओ पाहा
नोटाबंदीच्या निर्णयावर राग व्यक्त करणारी महिला
नोटाबंदीच्या निर्णयावर राग व्यक्त करणारा शेल कंपनीचा मालकWatch how corrupt politicians lost as the nation won after demonetisation. #DemoWinspic.twitter.com/fUDvxv1nR4
— BJP (@BJP4India) November 7, 2017
देखिए नोटबंदी से कैसे सवा दो लाख शेल कंपनियां और करोड़ों की बेनामी संपत्ति पकड़ी गई। #DemoWins pic.twitter.com/hsdgkrIdRs — BJP (@BJP4India) November 7, 2017
नोटाबंदीच्या निर्णयावर राग व्यक्त करणारा दहशतवादी
संबंधित बातम्या काँग्रेसचा उद्देश घराणेशाहीची सेवा, आमचा उद्देश देशसेवा : जेटली नोटाबंदीची घोषणा ऐकताच राहुल गांधींचा 'या' दोन व्यक्तींना फोन नोटाबंदी म्हणजे संघटीत लूट,अर्थव्यवस्था उद्ध्वस्त: मनमोहन सिंह नोटाबंदी आणि जीएसटीनंतर मोदी आणखी एक धक्का देणार? नोटाबंदीचं एक वर्ष : देश किती कॅशलेस झाला?देखिए नोटबंदी से कैसे टूटा आतंकियों का हौसला और उनके 'गजवा-ए-हिन्द' का सपना, शुक्रिया एक साथ खड़ा रहने के लिए... #DemoWinspic.twitter.com/TzPIGrxR8g
— BJP (@BJP4India) November 7, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement