एक्स्प्लोर

Nitin Gadkari : नितीन गडकरींची कॉंग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस, गडकरींचा व्हिडिओ शेअर करणे काँग्रेसला पडणार महागात? 

Nitin Gadkari : कॉंग्रेसकडून तसे न झाल्यास आमच्यासमोर दिवाणी आणि फौजदारी असे दोन्ही पर्याय खुले आहेत, असे गडकरींनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटलंय.

Nitin Gadkariकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणे काँग्रेसला (Congress) महागात पडू शकते. या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये हा व्हिडीओ लवकरात लवकर काढावा, आणि माफी मागावी असं सांगण्यात आलं आहे.

नितीन गडकरींची काँग्रेस पक्षाला कायदेशीर नोटीस

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस पक्षाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये कथित दिशाभूल करणारा आणि अपूर्ण व्हिडिओ शेअर केल्याबद्दल गडकरींनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे महासचिव जयराम रमेश यांना माफी मागण्यास सांगितले आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलेला व्हिडीओ खरा नाही, तसेच त्यात छेडछाड करण्यात आली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, हे काँग्रेस पक्षाने गडकरी हे विरोधी राजकीय पक्षाचे सदस्य असल्याने विचारपूर्वक तसेच जाणीवपूर्वक ही पोस्ट केली आहे. माझ्या आशिलाबद्दल पूर्णपणे माहिती घेतल्यानंतरच कोणताही व्हिडिओ किंवा विधान तुमच्या सोशल मीडिया साइटवर शेअर केले जावे. म्हणूनच आम्ही तुम्हाला कायदेशीर नोटीस पाठवत आहोत.

गडकरींच्या व्हिडीओचे कॅप्शन जाणूनबुजून लपवले?

नोटीसमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या वकिलाने म्हटलंय की, कॉंग्रेसकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओचे कॅप्शन जाणूनबुजून लपवण्यात आले आहे. हे केवळ केंद्रीय मंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. व्हिडीओबाबत दिलेले शीर्षकही पूर्णपणे चुकीचे असून वस्तुस्थितीचा विपर्यास करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. माझ्या आशिलाचा अपमान करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून पक्षकारांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे वकिलाने म्हटले आहे.

"24 तासांत व्हिडीओ काढा, लेखी माफी मागा"

कायदेशीर नोटीसमध्ये, सोशल मीडिया साइटला ते विधान किंवा व्हिडीओ काढून टाकण्यासही सांगण्यात आले आहे. यासोबतच त्यांना तीन दिवसांत लेखी माफी मागण्यास सांगण्यात आले आहे. तुमच्याकडून तसे न केल्यास आमच्यासमोर दिवाणी आणि फौजदारी असे दोन्ही पर्याय खुले आहेत, असे नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे.

कॉंग्रेसकडून 1 मार्च रोजी व्हिडीओ शेअर 

काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आज म्हणजेच 1 मार्च 2024 रोजी एक व्हिडीओ शेअर केला होता. सुमारे 19 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलेल्या गोष्टींचा विपर्यास करण्यात आला. व्हिडीओमध्ये शेतकरी आणि मजूर नाराज असल्याचे वर्णन करण्यात आले असून, ते थेट केंद्र सरकारवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. असे दृश्य आहे.

हेही वाचा>>>

भारतातील रस्ते अमेरिकेसारखे होणार, पण कधी? नितीन गडकरींनी सांगितला प्लॅन 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषदZero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?Zero Hour Anil Parab : छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना, अनिल परबांच्या विधानामुळे गोंधळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
Embed widget