एक्स्प्लोर

Vijaya Rahatkar : भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Vijaya Rahatkar विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही जबाबदारी पार पडली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत.

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थानच्या सह प्रभारी श्रीमती विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही जबाबदारी पार पडली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत. त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाचा असेल.‌ महिलांच्या उन्नतीसाठी घटनात्मक आणि कायदेशीर मुद्दांचा फेरआढावा घेणे, संसदीय- वैधानिक शिफारशी करणे, महिलांविषयक धोरणात्मक बाबींसाठी केंद्र व राज्य सरकारांना सल्ला देणे, महिलांविषयक प्रश्नांचा संशोधन करणे, त्यांच्या अडीअडचणींची दखल घेऊन कारवाई करणे आदींचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. 1992 मध्ये विशेष कायद्यान्वये स्थापन झालेल्या या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत.   

कोण आहेत विजया रहाटकर?

अत्यंत तळागाळापासून काम सुरू करून विविध राजकीय आणि सामाजिक जबाबदाऱ्या उत्तम पेलत विजया यांचे नेतृत्व विकसित होत गेले. महाराष्ट्र भाजप युवा मोर्च्याच्या उपाध्यक्ष ते भाजप महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. त्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या प्रदीर्घकाळ सदस्यादेखील राहिल्या आहेत. सध्या त्या राजस्थान भाजपच्या सहप्रभारी म्हणून पक्षाचे काम करीत आहेत. राजस्थान विधानसभेमध्ये भाजपने मिळविलेल्या यशामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. 

भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतानाच त्यांची महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती (2016 ते 2021) झाली होती. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून विजयाताईंनी "सक्षमा", "प्रज्ज्वला", "सुहिता" यांसारखे महिला केंद्रित कितीतरी उपक्रम राबविले. "सक्षमा" उपक्रमा मधून ऍसिड हल्ला पीडितांना दिलासा दिला. प्रज्ज्वला योजनेतून केंद्र सरकारच्या योजनांशी लाखो महिलांना जोडून घेतले. सुहिता योजनेतून महिलांना 24×7 हेल्पलाइन उपलब्ध करून दिली. निर्मल वारी योजनेतून लाखो महिला वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या. महिला केंद्रित विकास आणि महिला नेतृत्वाखाली विकास या संकल्पनांना कायदेशीर सुधारणांचा आधार मिळावा यासाठी वेगवेगळ्या सुधारणा सुचविल्या. त्यात पोस्को सेल, ट्रिपल तलाक सेल, तसेच मानवी तस्करी विरोधात विशेष सेलची निर्मिती यांचा समावेश आहे. विजयाताईंनी डिजिटल लिट्रसी, महिला आयोग आपल्या दारी, महिला आयोगाचे "साद" नियतकालिक यासारखे उपक्रम देखील घेतले. एका अर्थाने त्यांनी आयोगालाच पुनरुज्जीवन प्राप्त करून दिले होते. 

छत्रपती संभाजी नगरच्या महापौर त्याआधी 2007 ते 2010 या कालावधीत तत्कालीन औरंगाबाद आणि विद्यमान छत्रपती संभाजी नगरच्या महापौर असताना विजया रहाटकर यांनी शहर केंद्रित महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले. यात आरोग्य सेवेपासून ते पायाभूत सुविधा निर्मितीपर्यंत अनेक घटकांचा समावेश होता. त्याचबरोबर शहराला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे एक सांस्कृतिक केंद्र म्हणून स्वतंत्र ओळख मिळवून दिली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाद्वारे शहराच्या महसुलात मोलाची भर घातली. महापौर पदाच्या काळात विजयाताई महाराष्ट्र मेयर कौन्सिलच्या अध्यक्षा आणि ऑल इंडिया मेयर कौन्सिलच्या उपाध्यक्षदेखील होत्या. त्या सध्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट संस्थेच्या सल्लागार संचालिकादेखील आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Sharad Pawar : शरद पवार भाजपसोबत जाणार? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, धर्मांध शक्तीपासून दूर...
शरद पवार भाजपसोबत जाणार? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, धर्मांध शक्तीपासून दूर...
Who Is Paddy Upton : भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड चॅम्पियन, हॉकी टीमला ऑलिम्पिक मेडल अन् आता डी गुकेश बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन! तिन्ही यशांमधील 'महानायक' कोण?
भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड चॅम्पियन, हॉकी टीमला ऑलिम्पिक मेडल अन् आता डी गुकेश बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन! तिन्ही यशांमधील 'महानायक' कोण?
Sharad Pawar & BJP : ...म्हणून शरद पवार भाजपसोबत सत्तेत जाऊ शकतात; दिल्लीतील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
...म्हणून शरद पवार भाजपसोबत सत्तेत जाऊ शकतात; दिल्लीतील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
Rohit Sharma Fitness : रोहित शर्मा खूपच जाड झालाय, 4-5 कसोटी पण नीट...; हिटमॅनच्या फिटनेसवरून माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक वक्तव्य
रोहित शर्मा खूपच जाड झालाय, 4-5 कसोटी पण नीट...; हिटमॅनच्या फिटनेसवरून माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Winter Session : हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात सरकारी यंत्रणा सज्ज, सोमवारपासून कामकाज सुरूNCP Sharad Pawar:राष्ट्रवादी शरद पवार पक्षात कोणतेही मतप्रवाह नाही, Mahebub Shaikh यांची प्रतिक्रियाNCP Sharad Pawar News : शरद पवार पक्षात दोन मत प्रवाह; भाजपसह सत्तेत जावं एका गटाची मागणीBhandara Tiger News : झुडपात बसलेल्या वाघाला गावकऱ्यांचा विळघा, फोटो घेण्यासाठी गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Sharad Pawar : शरद पवार भाजपसोबत जाणार? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, धर्मांध शक्तीपासून दूर...
शरद पवार भाजपसोबत जाणार? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, धर्मांध शक्तीपासून दूर...
Who Is Paddy Upton : भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड चॅम्पियन, हॉकी टीमला ऑलिम्पिक मेडल अन् आता डी गुकेश बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन! तिन्ही यशांमधील 'महानायक' कोण?
भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड चॅम्पियन, हॉकी टीमला ऑलिम्पिक मेडल अन् आता डी गुकेश बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन! तिन्ही यशांमधील 'महानायक' कोण?
Sharad Pawar & BJP : ...म्हणून शरद पवार भाजपसोबत सत्तेत जाऊ शकतात; दिल्लीतील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
...म्हणून शरद पवार भाजपसोबत सत्तेत जाऊ शकतात; दिल्लीतील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
Rohit Sharma Fitness : रोहित शर्मा खूपच जाड झालाय, 4-5 कसोटी पण नीट...; हिटमॅनच्या फिटनेसवरून माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक वक्तव्य
रोहित शर्मा खूपच जाड झालाय, 4-5 कसोटी पण नीट...; हिटमॅनच्या फिटनेसवरून माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक वक्तव्य
Sharad Pawar & BJP Talks: शरद पवार गट भाजपसोबत जाण्याच्या हालचाली, अदानींच्या घरी बैठक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया, नेता म्हणाला...
अदानींच्या घरी बैठक, भाजपसोबत जाण्याच्या हालचाली; शरद पवार गटांच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
शरद पवार गटाच्या आमदार-खासदारांमध्ये चलबिचल, सत्तेत जाण्याच्या हालचाली, पण 'या' दोन पर्यायांमध्ये कन्फ्युजन
शरद पवार गटाच्या आमदार-खासदारांमध्ये चलबिचल, सत्तेत जाण्याच्या हालचाली, पण 'या' दोन पर्यायांमध्ये कन्फ्युजन
Sangli crime: तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
Embed widget