एक्स्प्लोर
Advertisement
भाजपाचे खासदार किर्ती आझाद काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
किर्ती आझाद बिहारच्या दरभंगा मतदार संघातून भाजपकडून खासदार आहेत. दरभंगा मतदार संघातून त्यांनी सलग तीनदा विजय मिळवला आहे. किर्ती आझाद यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वित्त मंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली डीडीसीएमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.
नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार किर्ती आझाद येत्या 15 फेब्रुवारीला काँगेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 15 फेब्रुवारीला सकाळी काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यलयात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थित ते प्रवेश करतील.
किर्ती आझाद बिहारच्या दरभंगा मतदार संघातून भाजपकडून खासदार आहेत. दरभंगा मतदार संघातून त्यांनी सलग तीनदा विजय मिळवला आहे. किर्ती आझाद यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वित्त मंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली डीडीसीएमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.
घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर भाजपने किर्ती आझाद यांना निलंबित केलं होतं. मागील काही दिवसांपासून आझाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर उघडपणे टीका करत आहेत. नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या मुद्द्याचा जाहीरनाम्यात समावेश करुन देशातील कोट्यवधी हिंदूंच्या भावनेशी खेळ केला आहे, असा आरोप किर्ती आझाद यांनी केला होता.
कोण आहे किर्ती आझाद?
किर्ती आझाद बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते भागवत झा आझाद याचे सुपुत्र आहे. आझाद यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी अनेक सामने खेळले आहेत. 1983 विश्वविजेता संघात त्यांचा समावेश होता. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सरुवात 1993 मध्ये दिल्लीतील गोल मार्केटतील विधानसभा निवडणुकीपासून केली होती. त्यानंतर ते 1998 मध्ये बिहारकडे वळाले. तिथे त्यांना पहिल्यांदा विजय मिळाला. मात्र 1998 नंतर त्यांना विजयासाठी 2009 सालापर्यंत वाट पाहावी लागली. त्यानंतर त्यांनी भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकीत सलग तीनदा विजय मिळवला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement