एक्स्प्लोर

UP Bjp Meeting : योगी मंत्रीमंडळातील चेहऱ्यांची यादी आज ठरणार, दिल्लीत होणार महत्वाची बैठक

यूपी मंत्रीमंडळ विस्तार आणि सरकार स्थापनेबाबत आज दिल्लीत भाजपच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला योगी आदित्यनाथही उपस्थित राहणार आहेत. 

UP Bjp Meeting : विधानसभेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपने पुन्हा सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. मागच्या निवडणुकीपेक्षा जरी भाजपचे संख्याबळ कमी झाले असले तरी बहुमत मिळवण्यात भाजपला यश आले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये नवीन मंत्रीमंडळ आणि सरकार स्थापनेसाठी भाजपच्या बैठका आणि विचारमंथन सुरु आहे. याच अनुषंगाने योगी आदित्यनाथ हे आज पुन्हा दिल्लीचा दौरा करणार आहेत. यूपी मंत्रीमंडळ विस्तार आणि सरकार स्थापनेबाबत आज दिल्लीत भाजपच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित राहणार आहेत. 

उत्तर प्रदेशचे भाजप अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, संघटन मंत्री सुनील बन्सल, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा या बैठकीसाठी मंगळवारी दिल्लीत पोहोचले आहेत. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील उपस्थित राहणार आहेत.

यूपी मंत्रिमंडळाबाबत दिल्लीत विचारमंथन

दिल्लीत होणाऱ्या या बैठकीला यूपीचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान आणि संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोषही उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी सलग दोन दिवस दिल्लीत बैठका घेतल्या होत्या. 
योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशात पुन्हा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले असले तरी यावेळी यूपीमध्ये किती उपमुख्यमंत्री होणार आणि मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार यावर सस्पेन्स कायम आहे. या दृष्टीने ही बैठक विशेष असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण या बैठकीत योगी आदित्यनाथ सरकारच्या नवीन मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे निश्चित केली जाणार आहेत.

योगींच्या शपथविधीची तयारी सुरु 

दरम्यान, गृहमंत्री अमित शाह आणि रघुवर दास लखनऊला जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, ही प्रक्रिया होळीनंतर होणार आहे. त्याचबरोबर योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. यूपीच्या प्रत्येक जिल्ह्यात एलईडी स्क्रीन लावून सोहळा थेट दाखवण्याची योजना करण्यात येत आहे. लखनौच्या एकना स्टेडियमवर या भव्य सोहळ्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. मंगळवारी अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही स्टेडियमची पाहणी केली आहे. भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्याचाही विचार केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

LPG Ship Shivalik : होर्मुझमधून आलेलं भारताचं ‘शिवालिक’ जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात; भारताला मोठा दिलासा
होर्मुझमधून आलेलं भारताचं ‘शिवालिक’ जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात; भारताला मोठा दिलासा
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Rasgulla Choking Death : रसगुल्ला खाताना घशात अडकला, श्वास गुदमरून एकाचा दुर्दैवी मृत्यू; लग्नाचा आनंद क्षणात स्मशान शांततेत बदलला
रसगुल्ला खाताना घशात अडकला, श्वासही घेता येईना; लग्नाचा आनंद क्षणात स्मशान शांततेत बदलला, झारखंडच्या जमशेदपुरमधली धक्कादायक घटना

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Embed widget