एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लालकृष्ण अडवाणींच्या पत्नी कमला अडवाणींचं निधन
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या पत्नी कमला अडवाणींचं आज निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
कमला अडवाणी यांना आज हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी कमला अडवाणी यांना मृत घोषित केलं.
लालकृष्ण अडवाणी आणि कमला अडवाणी यांचा विवाह 1965 मध्ये झाला होता. प्रतिभा आणि जयंत ही त्यांची दोन मुलं आहेत.
एक वर्षापूर्वीच लग्नाची गोल्डन जुबली
लालकृष्ण आणि कमला अडवाणी यांनी 22 फेब्रुवारीला साधेपणाने लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. मागील वर्षी 22 फेब्रुवारी 2015 रोजी त्यांच्या लग्नाची गोल्डन जुबली साजरी केली होती. लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अडवाणी आणि त्यांच्या पत्नी वर-वधूप्रमाणे सजले होते. या दिवस विस्मरणीय ठरावा, यासाठी त्यांच्या घरी एक खास कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं. यावेळी अडवाणींनी पत्नी कमला यांच्या गळ्यात पुन्हा एकदा वरमाला घालून जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. या कार्यक्रमाला मुलगी प्रतिभासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग इत्यादी वरिष्ठ नेते उपस्थित होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी कमला अडवाणी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, "कमला अडवाणी यांच्या निधनाची बातमी ऐकून अतिशय दु:ख झालं. त्या प्रेरणादायी होत्या. तसंच लालकृष्ण अडवाणी यांचा आधारस्तंभही होत्या."
https://twitter.com/narendramodi/status/717698293677957120
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रीडा
Advertisement