एक्स्प्लोर

IPhone 16 Flipkart big billon sale: फ्लिपकार्टचा ग्राहकांना धोका? स्वस्तात खरेदी केलेल्या iphones च्या ऑर्डर कॅन्सल केल्या, नेमकं घडलं काय?

काही ग्राहकांनी अर्ध्या रात्रीच ऑर्डर दिल्या. पूर्ण पेमेंट करून कन्फर्मेशनही मिळाले. मात्र, काही तासांत Flipkart ने त्या ऑर्डर रद्द केल्या. त्यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला.

 Big Billion Scam: Flipkart च्या Big Billion Day Sale ची ग्राहक आतुरतेने वाट पाहत होते. यावर्षी सेलमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली ऑफर म्हणजे iPhone 16 आणि iPhone 16 Pro वरील सवलत होती. कमी किमतीत आयफोन मिळण्याची संधी मिळत असल्याने हजारो ग्राहकांनी ऑर्डर दिल्या. पण काही तासांतच त्या ऑर्डर रद्द होत असल्याने Flipkart वर “स्कॅम” चे आरोप होत आहेत.

आकर्षक किंमतीवर विक्रीचे आमिष

Flipkart ने सेलमध्ये iPhone 16 (128GB) ₹51,999 तर iPhone 16 Pro (128GB) ₹69,999 ला उपलब्ध असल्याचे जाहीर केले. हा दर ऐकून ग्राहकांनी उत्साहात खरेदी केली. २२ सप्टेंबरला Flipkart Black आणि Plus सदस्यांसाठी सेल सुरू झाला, तर २३ सप्टेंबरपासून सर्वांसाठी खुला झाला.

ऑर्डर दिल्या, पेमेंटही केले… पण नंतर रद्द

काही ग्राहकांनी अर्ध्या रात्रीच ऑर्डर दिल्या. पूर्ण पेमेंट करून कन्फर्मेशनही मिळाले. मात्र, काही तासांत Flipkart ने त्या ऑर्डर रद्द केल्या. त्यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला.

सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

या घटनेनंतर सोशल मीडियावर Flipkart विरोधात संताप व्यक्त होत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “तीन पूर्ण पेमेंट ऑर्डर दिल्या होत्या, पण चार तासांत सगळ्या रद्द झाल्या. हा घोटाळाच आहे.” तर दुसऱ्याने तक्रार केली, “ऑर्डर यशस्वी झाल्या होत्या, पण सकाळी कोणतंही कारण न देता रद्द केल्या. Flipkart ग्राहकांची थट्टा करत आहे.”

काहींना शिपमेंट, काहींना नकार

काही Plus सदस्यांनी त्यांची ऑर्डर शिप झाल्याचे सांगितले आहे. मात्र, डिलिव्हरी अजून झालेली नाही. त्याउलट अनेकांनी ऑर्डर रद्द झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे Flipkart कडून नेमकं काय घडतंय, याबद्दल पारदर्शक माहिती दिली जात नसल्याची खंत ग्राहक व्यक्त करत आहेत.या समस्येचा सामना फक्त अॅपल खरेदीदारांनाच करावा लागला नाही - गुगल पिक्सेल 9, नथिंग फोन 3 आणि आयफोन 14 खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राहकांनीही काही मॉडेल्सवर अशाच प्रकारच्या रद्दीकरणांची आणि अचानक किमतीत वाढ झाल्याची तक्रार केली.

अधिकृत प्रतिक्रिया अद्याप नाही

Flipkart कडून या वादावर अधिकृत निवेदन आलेले नाही. ग्राहकांना आश्वस्त करण्यासाठी आणि गमावलेला विश्वास परत मिळवण्यासाठी कंपनी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. ग्राहकांचा मात्र एकच सवाल “हा सेल खरंच ऑफर देण्यासाठी होता का, की फक्त गाजावाजा आणि ट्रॅफिक वाढवण्यासाठी?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Accident: कोल्हापुरात नववर्षाच्या सुरुवातीलाच भरधाव इनोव्हानं तिघांना चिरडलं; तावडे हॉटेल परिसरात भीषण अपघात
कोल्हापुरात नववर्षाच्या सुरुवातीलाच भरधाव इनोव्हानं तिघांना चिरडलं; तावडे हॉटेल परिसरात भीषण अपघात
भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन
भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन
BMC Election 2026: भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Accident: कोल्हापुरात नववर्षाच्या सुरुवातीलाच भरधाव इनोव्हानं तिघांना चिरडलं; तावडे हॉटेल परिसरात भीषण अपघात
कोल्हापुरात नववर्षाच्या सुरुवातीलाच भरधाव इनोव्हानं तिघांना चिरडलं; तावडे हॉटेल परिसरात भीषण अपघात
भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन
भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन
BMC Election 2026: भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
Mumbai Rains: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना सरप्राईज; पहाटेपासून पावसाच्या धारा; पुढील 4 दिवस हवामान अंदाज काय?
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना सरप्राईज; पहाटेपासून पावसाच्या धारा; पुढील 4 दिवस हवामान अंदाज काय?
Pimpri Chinchwad Election 2026: अजित पवारांनी आणखी एका वाल्याचा वाल्मिकी केला, पुण्यानंतर पिंपरीत दोन हाफ मर्डरचे गुन्हे असलेल्या सिद्धार्थ बनसोडेंना उमेदवारी, काँग्रेसचा आरोप
अजित पवारांनी आणखी एका वाल्याचा वाल्मिकी केला, पुण्यानंतर पिंपरीत दोन हाफ मर्डरचे गुन्हे असलेल्या सिद्धार्थ बनसोडेंना उमेदवारी, काँग्रेसचा आरोप
Maharashtra Live Blog Updates : महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, वाचा फक्त एका क्लिकवर...
महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, वाचा फक्त एका क्लिकवर...
Virat Kohli Anushka Sharma: अनुष्कासोबत नव्या वर्षाची सुरुवात! विराट कोहलीची  Insta पोस्ट तुफान व्हायरल, म्हणाला...
अनुष्कासोबत नव्या वर्षाची सुरुवात! विराट कोहलीची  Insta पोस्ट तुफान व्हायरल, म्हणाला...
Embed widget