एक्स्प्लोर

भाजपचा चौथा उमेदवार, विजया रहाटकर राज्यसभेच्या रिंगणात

भाजपने महाराष्ट्राच्या कोट्यातून प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरन यांची नावं जाहीर केली होती. त्यातच सोमवारी विजया रहाटकरांना भाजपने राज्यसभेच्या मैदानात उतरवलं

नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेच्या जागेसाठी भाजपने चौथा उमेदवार दिला आहे. भाजपतर्फे विजया रहाटकर यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीची चुरस वाढली आहे. विजया रहाटकर या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या प्रमुखही आहेत. यापूर्वी त्यांनी औरंगाबादचं महापौरपदही भूषवलं आहे. भाजपने महाराष्ट्राच्या कोट्यातून प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरन यांची नावं जाहीर केली होती. त्यातच सोमवारी विजया रहाटकरांना भाजपने राज्यसभेच्या मैदानात उतरवलं. त्यामुळे अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक अटळ आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेकडून अनिल देसाई, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण, तर काँग्रेसकडून कुमार केतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 13 मार्च रोजी निवडणूक अर्जाची छाननी होणार असून 15 मार्च ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. 16 राज्यातील राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान झाल्यावर त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. एप्रिल महिन्यात राज्यसभेचे 58 खासदार निवृत्त होणार आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 10, तर महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. विधानसभेचे संख्याबळ पाहता, राज्यातील तीन जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जातो. प्रकाश जावडेकर हे विद्यमान केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री असून ते सध्या मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर गेले आहेत. त्यामुळे आता ते होम ग्राऊंडवरुन म्हणजे महाराष्ट्रातून राज्यसभेत जातील. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करुन एनडीएत सहभाग घेतला. मात्र राज्यातील मंत्रिपदाच्या आशेवर असणारे राणे आता राज्यसभेच्या दिशेने कूच करत आहेत. एकनाथ खडसे आरोपांच्या जंजाळात अडकल्यापासून मंत्रिमंडळापासून दूर आहेत. त्यामुळे त्यांना दिल्लीत नेण्याच्या पक्षाच्या हालचाली होत्या, मात्र खडसे त्यासाठी अनुत्सुक होते. सचिन तेंडुलकर, रेखा, अनु आगा या तिघांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती नियुक्त तीन नवे खासदार कोण असणार याचीही उत्सुकता आहे. महाराष्ट्रातून निवृत्त होणारे खासदार वंदना हेमंत चव्हाण  - राष्ट्रवादी डी. पी. त्रिपाठी  - राष्ट्रवादी रजनी पाटील  - काँग्रेस अनिल देसाई  - शिवसेना राजीव शुक्ला - काँग्रेस अजयकुमार संचेती - भाजप कोणत्या पक्षाचे किती खासदार निवृत्त? भाजप -17 काँग्रेस - 12 समाजवादी पक्ष - 6 जदयू - 3 तृणमूल कॉंग्रेस - 3 तेलुगू देसम पक्ष - 2 राष्ट्रवादी कॉंग्रेस - 2 बीजद - 2 बसप - 1 शिवसेना - 1 माकप - 1 अपक्ष  - 1 राष्ट्रपती नियुक्‍त - 3 कोणत्या राज्यातील किती जागा? आंध्र प्रदेश - 3 बिहार - 6 छत्तीसगड - 1 गुजरात - 4 हरियाणा - 1 हिमाचल प्रदेश - 1 कर्नाटक - 4 मध्य प्रदेश - 5 महाराष्ट्र - 6 तेलंगणा - 3 उत्तर प्रदेश - 10 उत्तराखंड - 1 पश्चिम बंगाल - 5 ओदिशा - 3 राजस्थान - 3 झारखंड - 2
संबंधित बातम्या
राज्यसभेसाठी भाजपचे राज्यातून तीन नावं जाहीर
भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांना राज्यसभेची उमेदवारी
राज्यसभेवर भाजपकडून जावडेकर-राणेंसोबत एकनाथ खडसे?
राज्यसभेच्या 58 जागांसाठी 23 मार्चला निवडणूक
राज्यसभा निवडणूक : शिवसेनेकडून अनिल देसाईंना पुन्हा संधी
जया बच्चन पुन्हा समाजवादी पक्षाकडून राज्यसभा उमेदवार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav  Thackeray on Dhananjay Mahadik : धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
Sunil Tingre: 'पोर्शे प्रकरणातील ती दोन माणसं आमदाराच्या जवळची...', सरोदेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल, पोलीस स्टेशला गेल्याबाबत केला उलट सवाल
'पोर्शे प्रकरणातील ती दोन माणसं आमदाराच्या जवळची...', सरोदेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल, पोलीस स्टेशला गेल्याबाबत केला उलट सवाल
Radhanagari Vidhan Sabha : मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही!
मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही!
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊतDhananjay Munde Beed Parali : मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा, पंकजाताईंचे आभार9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav  Thackeray on Dhananjay Mahadik : धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
Sunil Tingre: 'पोर्शे प्रकरणातील ती दोन माणसं आमदाराच्या जवळची...', सरोदेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल, पोलीस स्टेशला गेल्याबाबत केला उलट सवाल
'पोर्शे प्रकरणातील ती दोन माणसं आमदाराच्या जवळची...', सरोदेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल, पोलीस स्टेशला गेल्याबाबत केला उलट सवाल
Radhanagari Vidhan Sabha : मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही!
मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही!
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Rupali Chakankar : हॉटेलमध्ये दीड हजारांची टीप देणाऱ्यांना पैशांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
हॉटेलमध्ये दीड हजारांची टीप देणाऱ्यांना पैशांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Embed widget