(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bihar Firing : बिहारमधील मुझफ्फरपूरमधील रेस्टॉरंटमध्ये गोळीबार; भयानक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
बिहारमधील मुझफ्फरपूर येथे एका रेस्टॉरंटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे.
Bihar Firing : बिहारमधील मुझफ्फरपूर येथे एका रेस्टॉरंटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. राज्याच्या बेगुसराय जिल्ह्यात आणखी एका गोळीबाराची नोंद झाली आहे, जिथे एका निवृत्त शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. परंतु, दोन्ही प्रकरणांमध्ये अधिक तपशीलांची प्रतिक्षा आहे.
सिटी एसीपी अरविंद प्रताप सिंह म्हणाले की, "येथे किमान 10 राउंड गोळीबार झाला. प्रथमदर्शनी हा गोळीबार लोकांना घाबरवण्यासाठी करण्यात आलेला दिसत आहे. कोणा एकाला मारण्याकरता हा गोळीबार करण्यात आलेला नाही. या गोळीबारात 4 लोक सहभागी होते. गोळीबार केलेल्या या 4 जणांना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
#WATCH | Miscreants open fire at a restaurant in Bihar's Muzaffarpur
— ANI (@ANI) August 20, 2023
(CCTV Visuals) pic.twitter.com/8VF9dOB5iv
दरम्यान, बिहारमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गोळीबार आणि हत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी एका पत्रकाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्या पत्रकाराचे नाव विमल यादव असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी चारही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केल्याचे सांगितले जात आहे. तर या हत्येत दोन पत्रकारांचा देखील हात होता, अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे. अरारिया इथल्या राणीगंज बाझार इथल्या राहत्या घरी हा प्रकार घडला आहे. दोन वर्षांपूर्वी या पत्रकाराच्या सरपंच असलेल्या भावाची देखील अशाच प्रकारे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी 24 तासांत आरोपीला अटक केली आहे.