Vande Bharat Express: वंदे भारत ट्रेनमध्ये 'सिगारेट'मुळे गोंधळ! डब्यात पसरला धूर; काचा फोडून प्रवाशांनी काढला पळ; पाहा व्हिडिओ
Vande Bharat Viral Video: सर्व प्रवासी ट्रेनमधून आरामात प्रवास करत होते, तेव्हाच एका प्रवाशाला सिगारेट ओढण्याची तीव्र तलफ आली आणि त्यानंतर जे घडलं ते पाहा...
Vande Bharat Viral Video: वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) ट्रेन कधी गुरांना आदळल्याने तर कधी अन्य कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा या ट्रेनची अशीच काहीशी चर्चा सुरू झाली आहे, पण यावेळी जी घटना समोर आली आहे ती अतिशय खळबळजनक आहे. या जगात सिगारेट आणि विडीची तलफ असणाऱ्यांची कमी नाही, जगाच्या कानाकोपऱ्यात सिगारेट ओढणारे लोक आढळतात. ही माणसं तलफ लागल्यास अगदी कुठेही सिगारेट पिऊ शकतात.
अशाच एका सिगारेटमुळे वंदे भारत एक्सप्रेसमध्ये गोंधळ उडाला. सिगारेटच्या धुरामुळे इतकी भीषण स्थिती ओढावली का प्रवासी बाहेर पडण्यासाठी अगदी ट्रेनच्या खिडक्या देखील तोडायला लागले. तिरुपतीहून (Tirupati) सिकंदराबादला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये हा भयानक प्रकार घडला आहे.
नेमकं घडलं काय?
वंदे भारत ट्रेन आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) तिरुपतीहून सिकंदराबादला जात होती. ट्रेनने गुडूर स्थानक ओलांडलं होतं आणि ट्रेनचं शेवटचं ठिकाण सुमारे 8 तासांच्या अंतरावर होतं. सर्व प्रवासी ट्रेनमध्ये आरामात प्रवास करत होते. तेव्हा एका प्रवाशाला सिगारेट ओढण्याची तीव्र इच्छा झाली. लोकांना काही त्रास व्हायला नको, म्हणून तो प्रवासी शांतपणे ट्रेनच्या टॉयलेटमध्ये गेला आणि तिथे धूम्रपान करू लागला. टॉयलेटमध्ये सिगारेटचा धूर पसरताच लगेच फायर अलार्म वाजू लागला. त्यानंतर स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा काम सुरू झाली आणि संपूर्ण डब्यात एरोसोल फवारणीला सुरुवात झाली.
प्रवाशांमध्ये घबराट पसरली
फायर अलार्म वाजल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि संपूर्ण ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागले. सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीला ट्रेनमध्ये फायर अलार्म असल्याचं माहित नव्हतं. त्यात ही व्यक्ती विना तिकीट ट्रेनमध्ये प्रवास करत होती, त्यामुळे तो टॉयलेटमध्ये लपून बसल्याचंही बोललं जात आहे.
వందే భారత్ రైలులో పొగలు
— Telugu Scribe (@TeluguScribe) August 9, 2023
గూడూరు - మనుబోలు మధ్య రైలు నిలిపివేత. తిరుపతి నుంచి హైదరాబాద్ వెళుతుండగా ఘటన.
రైలు టాయిలెట్లో ఓ వ్యక్తి సిగరెట్ తాగడంతో రైలు నిండా పొగలు.#VandeBharat #VandeBharatExpress pic.twitter.com/Vl2tW65oph
पोलिसांनी तात्काळ प्रवाशाला घेतलं ताब्यात
रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. आरोपी प्रवाशाला पोलिसांनी नेल्लोर येथून ताब्यात घेतलं. हे सर्व प्रकरण थंड झाल्यावर रेल्वे रवाना करण्यात आली. या घटनेचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ट्रेनमध्ये निर्माण झालेलं गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
हेही वाचा: