Bihar CM Nitish Kumar in NDA : इकडं इंडिया आघाडीत असल्याचं दाखवलं अन् तिकडं अमित शाहांशी भेटून भाजपशी बोलणी; नितीशकुमारांनी 50 दिवसांत 'खेळ' केला
अवघ्या 50 दिवसांपूर्वी 10 डिसेंबर 2023 रोजी एका कार्यक्रमात अमित शाह आणि नितीश कुमार यांची भेट झाली होती. भाजपसोबतची युती तोडल्यानंतर अमित शाह आणि नितीश कुमार यांची ही पहिलीच भेट होती.
Bihar Political Crisis : “नवीन पात्रं येत आहेत, पण जुने नाटक चालू आहे…” प्रसिद्ध कवी राहत इंदोरी यांच्या या ओळी बिहारच्या राजकारणावर अगदी चपखल बसतात. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दल सोडून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाले आहेत. पुन्हा त्यांचे युतीचे साथीदार बदललेले दिसतील, पण मुख्यमंत्री तेच राहणार आहेत. नितीश कुमार यांनी आज रविवारी (28 जानेवारी) सकाळी जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्यानंर नवव्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली.
A total of 8 leaders took oath as cabinet ministers in the new government led by Nitish Kumar.
— ANI (@ANI) January 28, 2024
Three from BJP – Samrat Choudhary, Vijay Kumar Sinha, Prem Kumar. Three from JDU – Vijay Kumar Choudhary, Bijendra Prasad Yadav, Shrawon Kumar and Hindustani Awam Morcha (Secular)… pic.twitter.com/CTEezzqpEb
दीड महिन्यापूर्वी स्क्रिप्ट लिहिली गेली
2022 मध्ये, जेव्हा नितीश कुमार यांनी दुसऱ्यांदा भाजप सोडला आणि आरजेडी, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले, तेव्हा त्यांनी अनेक प्रसंगी सांगितले की त्यांना मरायला आवडेल पण भाजपसोबत जाणार नाही. नितीशकुमारांसाठी हे गेट कायमचे बंद होणार असल्याचेही भाजपमधील अनेक नेत्यांनी सांगितले, परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की, असे काय झाले की दोन्ही बाजूंनी सर्व काही विसरले गेले.
#WATCH | Nitish Kumar takes oath as Bihar CM for the 9th time after he along with his party joined the BJP-led NDA bloc. pic.twitter.com/ePGsqvusM3
— ANI (@ANI) January 28, 2024
हा संपूर्ण खेळ समजून घेण्यासाठी तुम्हाला 50 दिवस मागे जावे लागेल. 10 डिसेंबर 2023 रोजी एका कार्यक्रमात अमित शाह आणि नितीश कुमार यांची भेट झाली होती. भाजपसोबतची युती तोडल्यानंतर अमित शाह आणि नितीश कुमार यांची ही पहिलीच भेट होती.
#WATCH | Nitish Kumar takes oath as Bihar CM for the 9th time after he along with his party joined the BJP-led NDA bloc.#BiharPolitics pic.twitter.com/v9HPUQwhl3
— ANI (@ANI) January 28, 2024
या बैठकीनंतर बिहारमधील राजकीय चित्र बदलण्यास सुरुवात झाल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. 29 डिसेंबर 2023 रोजी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर 19 दिवसांनी नितीश कुमार यांनी JDU च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली. त्यातच नितीश कुमार यांनी स्वतः लालन सिंह यांना राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवून पदाची सूत्रे हाती घेतली. अध्यक्ष बनताच नितीशकुमार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. अध्यक्ष बदलल्यानंतर 16 दिवसांनी अमित शाह यांची नितीश कुमार आणि जेडीयूबाबतची भूमिका बदलली. एका मुलाखतीत अमित शाह यांनी नितीश कुमार यांच्या पुनरागमनाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, राजकारणात इतर कशाचीही चर्चा होत नाही. कोणाचा प्रस्ताव असल्यास त्यावर विचार केला जाईल.
इतर महत्वाच्या बातम्या