(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bharat Jodo Nyay Yatra In Assam : तर गुन्हा नोंद करून अटकेची कारवाई करणार! भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये पोहोचताच भाजप मुख्यमंत्र्यांचा इशारा!
Bharat Jodo Nyay Yatra In Assam : जो पर्यायी मार्ग मागितला जाईल, त्याला परवानगी दिली जाईल, पण शहराच्या आत जाण्याचा आग्रह असेल तर आम्ही पोलिसांची व्यवस्था करणार नाही, असा इशारा सरमा यांनी दिला आहे.
Himanta Biswa Sarma Reaction on Nyay Yatra In Assam : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा नागालँडमधून आसाममध्ये (Bharat Jodo Nyay Yatra In Assam) पोहोचली आहे. शिवसागर जिल्ह्यातून सुरू झालेली ही यात्रा आसामच्या 17 जिल्ह्यांतून जाणार आहे. यामध्ये गुवाहाटी शहराचाही समावेश करण्यात आला आहे. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी आज गुरुवारी (18 जानेवारी) सांगितले की भारत जोडो न्याय यात्रा गुवाहाटी शहरात प्रवेश करणार नाही.
#WATCH गुवाहाटी: कांग्रेस की भारत जोड़ो न्याय यात्रा पर असम के मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा ने कहा, "हमने कहा है कि शहरों के अंदर से नहीं जाना है... जो भी वैकल्पिक रास्ता मांगा जाएगा उसकी अनुमति दे दी जाएगी लेकिन अगर शहर के अंदर से जाने की जिद्द की जाएगी तो हम पुलिस की व्यवस्था… pic.twitter.com/tdB3nTb0NC
— ANI_HindiNews (@AHindinews) January 18, 2024
गुन्हा नोंदवून निवडणुकीनंतर अटक करेन
प्रसारमाध्यमांशी बोलताना आसामचे मुख्यमंत्री म्हणाले की, "आम्ही म्हटले आहे की कोणीही शहरांच्या आत जाऊ नये. जो पर्यायी मार्ग मागितला जाईल, त्याला परवानगी दिली जाईल, पण शहराच्या आत जाण्याचा आग्रह असेल तर आम्ही पोलिसांची व्यवस्था करणार नाही. मी गुन्हा नोंदवून निवडणुकीनंतर अटक करेन. मी आता काहीही करणार नाही."
LIVE: Bharat Jodo Nyay Yatra | Jorhat | Assam https://t.co/pUKdZv6H7b
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 18, 2024
हिमंता बिस्वा सरमा पुढे म्हणाले की, “ही न्याय यात्रा नसून मियाँ यात्रा आहे. जिथे जिथे मुस्लिम आहेत तिथे ते प्रवास करत आहेत. यासोबतच त्यांनी गांधी कुटुंबावर हल्लाबोल करत म्हटले की, “माझ्या मते हे गांधी कुटुंब देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे. देशातील बोफोर्स ते भोपाळ गॅस घोटाळ्यातील आरोपींना पळवून नेण्यापर्यंतचा यात समावेश आहे. सर्वात भ्रष्ट कुटुंब म्हणजे गांधी घराणे. हे केवळ भ्रष्टच नाही तर डुप्लिकेट आहे. त्यांच्या घराण्याचे नाव गांधी नाही. तो डुप्लिकेट नावाने फिरत आहे.”
देश का सबसे बड़ा मुद्दा बेरोजगारी है।
— Congress (@INCIndia) January 18, 2024
केवल दो-तीन उद्योगपतियों के लिए सरकार चलाई जाती है।
नरेंद्र मोदी देश के एयरपोर्ट, कृषि और सारा इंफ्रास्ट्रक्चर अडानी को सौंप रहे हैं।
GST और नोटबंदी ने छोटे-मध्यम उद्योग को खत्म कर दिया और नतीजा ये हुआ कि युवाओं को रोजगार नहीं मिल रहा है।… pic.twitter.com/OZMYwKbhAI
इतर महत्वाच्या बातम्या