Bharat Bandh LIVE UPDATE : कृषी कायद्यांच्या विरोधात आज 'भारत बंद'; पाहा लाईव्ह अपडेट्स
Bharat Bandh LIVE Updates: केंद्राच्या तीन कृषी विधेयकांच्या (Agriculture Bill) विरोधात संयुक्त किसान मोर्चानं (Samyukta Kisan Morcha) आज, 27 सप्टेंबरला भारत बंद (bharat bandh) ची घोषणा केली आहे.
LIVE
Background
Bharat Bandh: गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा (Farmer Protest) पुढचा टप्पा आता पाहायला मिळत आहे. केंद्राच्या तीन कृषी विधेयकांच्या (Agriculture Bill) विरोधात संयुक्त किसान मोर्चानं (Samyukta Kisan Morcha) आज, 27 सप्टेंबरला 'भारत बंद' (bharat bandh) ची घोषणा केली आहे. या बंदला राजकीय पक्ष, कामगार संघटना, शेतकरी संघटनांसह बँकिंग संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे.
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा), मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, रिव्होल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी) नं एका संयुक्त पत्रकात म्हटलं आहे की, कृषी कायदे हटवणे आणि शेतमालाला किमान हमीभाव कायदाच्या मागणीसाठी सुरु असलेला ऐतिहासिक शेतकरी संप 10व्या महिन्यात पोहोचला आहे. यामुळं आता भारत बंदचं आयोजन करण्यात आलं आहे. नागरिकांनी शेतकऱ्यांच्या मुद्यांवर या बंदला पाठिंबा द्यावा, असं या पत्रकात म्हटलं आहे.
भारत बंदला बारामतीतील औद्योगिक वसाहतीतील कामगार संघटनांचा पाठिंबा
कृषी विषयक कायद्याविरोधात आज भारत बंद आहे. या भारत बंदला बारामतीतील औद्योगिक वसाहतीतील कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे.. विविध संघटनांनी या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. शेतकरी कायदे त्याच बरोबर कामगार काद्यायत जाचक अटी टाकल्याने तात्काळ या जाचक अटी रद्द करण्याची मागणी कामगारांनी केलीये. तसेच वाढते पेट्रोल-डिझेल त्याचबरोबर गॅस सिलेंडरचे भाव वाढते खासगीकरण आणि अन्य अनेक मागण्यांसाठी आज कामगारांनी बंद पुकारला आहे..
सावंतवाडीत कॉंग्रेसच्यावतीने जोरदार घोषणाबाजी
देशव्यापी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला जिल्हा काँग्रेसकडून जाहीर पाठिंबा देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारने केलेले तिन्ही काळे कृषी कायदे मागे घ्यावेत तसेच शेतीमालाला किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करण्यात यावा अशी मागणी करत केंद्र सरकार विरोधात सावंतवाडीत कॉंग्रेसच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष व कार्यकर्ते यानी सावंतवाडीतील गांधी चौकात भारत बंदला पाठींबा देत आंदोलन केले.
यवतमाळमध्ये शेतकरी नेत्यांचं धरणे आंदोलन
भारत बंदच्या समर्थनार्थ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज अकोल्यात मोटार सायकल रॅली
संयुक्त किसान मोर्चाने आज केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात भारत बंदची हाक दिलीये. या भारत बंदच्या समर्थनार्थ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज अकोल्यात मोटरसायकल रॅली काढलीय. बसस्थानक चौकातील काँग्रेस मुख्यालयापासून सुरू झालेली ही रॅली गांधी मार्ग, टिळक मार्ग, रतनलाल प्लॉट, सिव्हील लाईन चौक या मार्गाने काढण्यात आलीय. हुतात्मा स्मारक येथे या रॅलीचा समारोप करण्यात आलाय. यावेळी शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानं बंद करण्याची पटोलेंनी व्यापार्यांना विनंती केलीय. या रॅलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोरोना आणि वाहतूक नियमांचा पुर्णतः फज्जा उडवलाय.
यावेळी बोलतांना नाना पटोलेंनी मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या विरोधात आजच्या बंदला काँग्रेसचा पाठींबा असल्याचं म्हटलंय. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळांवरील कारवाईचा नाना पटोलेंनी निषेध केलाय. आता ईडी-सीबीआयची कारवाई सामान्य असल्याचं ते म्हणालेय. या संस्था आता भाजपाच्या ईशाऱ्यावर चालणाऱ्या संस्था असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
भाजपचे आमदार सुनील कांबळेंच्या महिला अधिकार्याला अश्लील शिवीगाळ आणि दमदाटीवर पटोलेंनी टीका केलीय. महिलांचा अपमान ही भाजपची संस्कृती असल्याचं ते म्हणालेय.
नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचे नेते आशिष देशमुखांकडून भाजपच्या प्रचारावर प्रदेशाध्यक्षांनी गंभीर दखल घेतलीय. पक्ष निरिक्षकांच्या अहवालानंतर देशमुखांवर कारवाईचा निर्णय घेणार असल्याचं ते म्हणालेय. नेता कितीही मोठा असला तरी बेशिस्त खपवून घेणार नाही, असा इशारा नाना पटोलेंनी आशिष देशमुखांना दिलाय.