एक्स्प्लोर

Bharat Bandh LIVE UPDATES : आज शेतकऱ्यांचा देशव्यापी बंद, जाणून घ्या क्षणाक्षणाचे अपडेट्स

Bharat Bandh Today, 8 December 2020 LIVE Updates: नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने आज, म्हणजेच 8 डिसेंबरला 'भारत बंद' पुकारण्यात आला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.

LIVE

Bharat Bandh LIVE UPDATES : आज शेतकऱ्यांचा देशव्यापी बंद, जाणून घ्या क्षणाक्षणाचे अपडेट्स

Background


Bharat Bandh : नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने आज, म्हणजेच 8 डिसेंबरला 'भारत बंद' पुकारण्यात आला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. अशा परिस्थितीत 8 डिसेंबरला 'भारत बंद' कसा होईल, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. दरम्यान या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.


जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून 'भारत बंद'ला देखील समर्थन दर्शवलं आहे. तसेच, देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्य व केंद्रशासित प्रदेशांना नियमावली पाठवण्यात आली आहे. नियमावली पाठवताना केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना भारत बंद दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सांगितले आहे. याव्यतिरिक्त, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासकांनी कोविड -19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. सोशल डिस्टन्स राहिल याची काळजी घेतली पाहिजे.


जाणून घ्या शेतकऱ्यांच्या भारत बंदशी निगडीत 10 मोठ्या गोष्टी :


1. सर्वांना 'सांकेतिक' बंदमध्ये सहभागी होण्याचं आव्हान करत शेतकरी प्रतिनिधींनी म्हटलं आहे की, "आंदोलनातंर्गत सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत ते 'चक्का जाम' आंदोलन करतील. ज्यादरम्यान, प्रमुख रस्त्यांवर आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनातंर्गत उत्तरेकडील राज्यांमध्ये खासकरुन पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत.


2. शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, "आमचा भार बंद राजकीय पक्षांच्या बंदपेक्षा वेगळा असणार आहे. हा विचारधारेमुळे करण्यात येणारा चार तासांचा सांकेतिक बंद आहे. सामान्या माणसांना कोणताही त्रास होऊ नये त्यासाठी आम्ही या वेळेत त्यांनी प्रवास करु नये, असं आवाहन करतो." पुढे बोलताना ते म्हणाले की, "आम्ही दुकानदारांनाही या वेळेत आपली दुकानं बंद ठेवण्याची विनंती करतो."


3. भारतीय शेतकरी एका संघटनेचे अध्यक्ष जगजीत सिंह दल्लेवाल यांनी शेतकऱ्यांना शांतता राखण्याचं आव्हान केलं आहे. तसेच भारत बंद व्यवस्थित पार पाडण्यासाठी कोणावरही जबरदस्ती न करण्याचं आव्हान केलं आहे. तसेच ते म्हणाले की, "भारत बंद दरम्यान, आपत्कालीन सेवांना सूट देण्यात आली आहे."


4. अनेक नेत्यांनी दावा केला आहे की, भारत बंद संपूर्ण देशात प्रभावी असणार आहे. शेतकरी नेते बलबील सिंह राजेवाल यांनी सांगितलं की, "मोदी सरकारला आमच्या मागण्या मान्य कराव्या लागतील. आम्ही नव्या कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहोत."


5. केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्या भारत बंदच्या एका दिवसांनी म्हणजेच, 9 डिसेंबरला सहाव्या फेरिची बैठक पार पडणार आहे. कारण मागील बैठक निष्फळ ठरली आहे. विरोधी पक्षांनी शेतकरी आंदोलनाला दिलेला पाठिंब्यानंतर भाजपनं त्यांची विचारसरणी अत्यंत लज्जास्पद आणि दुटप्पी असल्याचं म्हटलं आहे.


रविशंकर प्रसाद पुढे बोलताना म्हणाले की, "आम्ही विरोधी पक्ष, विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर पक्षांच्या लज्जास्पद दुहेरी मानसिकता देशासमोर आणण्यासाठी आलो आहोत. जेव्हा यांचं राजकीय अस्तित्व संपत आलं आहे, त्यावेळी ते वाचवण्यासाठी ते कोणत्याही सरकार विरोधी आंदोलनात सहभागी होत आहेत." रविशंकर प्रसाद म्हणाले की, "जे आम्ही केलं, यूपीए सरकारही तेच करत होती."


6. शेतकरी आंदोलनाला सेलिब्रिटी, खेळाडू आणि मजूर संघटनांसह विविध वर्गातील लोकांनीही समर्थन दर्शवलं आहे. जवळपास 95 लाख ट्रक मालक आणि इतरांचं प्रतिनिधित्व करणारी देशभरातील ट्रान्सपोर्ट संस्थांची मुख्य संस्था ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट काँग्रेस (एआईएमटीसी) ने सांगितलं की, बंदच्या समर्थनार्थ ते संपूर्ण देशात आपलं संचलन बंद ठेवणार आहे. अशातच आजच्या भारत बंदचा वाहतूक सेवांवरही परिणाम होऊ शकतो.


7. भारत बंदच्या दिवशी शेतकरी संघटनांनी दूध, फळे आणि भाजीपाल्याच्या सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजे तुम्हाला 8 डिसेंबरला या सेवा मिळणार नाहीत. विशेष म्हणजे, रविवारी दिल्लीत निषेध करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांचा अकरावा दिवस आहे. 8 डिसेंबरला शेतकर्‍यांनी भारत बंद पुकारला आहे.


8. सीएआयटी आणि ऑल इंडिया ट्रांसपोर्टर्स वेलफेयर एसोसिएशनने सांगितलं की, दिल्लीसह देशभरात बाजार खुले राहणार आहेत, तसेच परिवहन सेवाही सुरु राहतील.


9. शेतकरी आंदोलनाला बॉलिवूड सेलिब्रिटींनीही पाठिंबा दर्शवला आहे. प्रियंका चोप्रा, सोनम कपूर यांच्यासह अनेक कलाकारांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यात रितेश देशमुख, हंसल मेहता, गौहर खान, चित्रांगदा सिंह यांचा समावेश आहे. अभिनेता दिलजीत दोसांझने तर या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक कोटी रुपये दिले आहेत.


10. राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांशिवाय या बंदला अनेक बॅंक कर्मचारी संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे. बॅंक यूनियन्सने सरकारला लवकरात लवकर या मुद्द्यावर तोडगा काढावा असं आवाहन केलं आहे. ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशन (एआयबीईए)नं म्हटलं आहे की, सरकारने पुढं येऊन देश आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या मागण्यांवर विचार करुन समाधान केलं पाहिजे.


महत्त्वाच्या बातम्या :







 


 
16:25 PM (IST)  •  08 Dec 2020

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात आज पंढरपुरात जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने पंढरपूर - सांगली रस्त्यावर टायर पेटवून आंदोलन केले. आज पंढरपुरात विविध शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडीच्या वतीने बंद मध्ये सहभाग घेतला. त्यानंतर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नितीन नागणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर पेटवून आंदोलन केले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
15:38 PM (IST)  •  08 Dec 2020

केंद्र सरकारनं लागू केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात गेल्या 13 दिवसांपासून पंजाब आणि हरियाणा येथील शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करत आहेत. या आंदोलनात आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे देखील उतरले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अण्णा हजारे यांनी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
15:27 PM (IST)  •  08 Dec 2020

औरंगाबादेत नव्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान आंदोलकांनी शहरातील दिल्लीगेट बागांमध्ये निदर्शने केली. या सर्वपक्षीय निदर्शकांनी दिल्ली गेट भागात काही काळ रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, आंदोलक आणि पोलिस यांच्यामध्ये झटापट झाली
15:27 PM (IST)  •  08 Dec 2020

दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला.. यावेळी मोर्चात विविध सामाजिक संघटना, शेतकरी संघटनांनी सहभाग नोंदवला... मोर्चामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला.. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मुख्य मार्गानं निघालेल्या मोर्चाचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला.. दरम्यान काही प्रतिष्ठान बंद होती तर काही प्रतिष्ठान सुरू होती.. यावेळी रॅली काढून दुकान बंद करण्याच आवाहन करण्यात आलं.. काही दुकानांच अर्ध शटर उघड ठेवल्याच दिसत होतं.. बाजार समित्या मुख्यत्वे बंद राहिल्यात.. वर्ध्यातील सावंगी टी पॉइंटवर काही वेळ रस्ता रोको करण्यात आला..
15:26 PM (IST)  •  08 Dec 2020

भारत बंद आंदोलन दरम्यान सांगली मध्ये युवक काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. केंद्र सरकारचा पुतळा दहन करताना सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात समोर हा प्रकार घडला. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रॅली काढत काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पुतळा दहन करण्याचा प्रयत्न होता .मात्र पोलिसांनी तो पुतळा काढून घेतला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या पुतळ्याचं दहन करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी हा पुतळा दहन प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान यावेळी पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पुतळा दहन वेळी झटापटीचा प्रकार घडला. पोलिसांनी आंदोलकांच्या ताब्यातला पुतळा काढून घेतला.त्यामुळे काही वेळ याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
15:25 PM (IST)  •  08 Dec 2020

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आष्टीत एकूण अकरा संघटनेने आष्टी तालुका बंदची हाक देत आज सकाळी किनारा चौक ते तहसील कार्यालया पर्यंत रॅली काढत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध नोंदवला. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात दशक्रिया विधी आंदोलन करून आंदोलन कर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर मुंडन केले..यावेळी आष्टी शहरातील काही व्यापाऱ्यांनी बंदला केराची टोपली दाखवून दुकाने चालू ठेवली होती त्या व्यापाऱ्यांचे समन्वय समितीच्या वतीने गांधीगिरी पद्धतीने सत्कार करण्यात आला.
15:22 PM (IST)  •  08 Dec 2020

शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला बेळगावात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळी सहा वाजल्यापासून विविध संघटनांचे कार्यकर्ते विविध भागात फिरून बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन करत होते.रयत संघटना,हसिरू सेना,अंगणवाडी ,कामगार संघटना आदी तीसहून अधिक संघटना भारत बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या.शहरातील काही भागातील दुकाने बंद होती तर उपनगरात व्यवहार नेहमी प्रमाणे सुरळीत सुरू होते.काही काळ शहर आणि बाहेरगावचे ची बस सेवा बंद ठेवण्यात आली होती.राणी कितुर चन्नमा चौकात जमून आंदोलनकर्त्यांनी वाहतूक रोखून धरली.आंदोलनकर्त्यांनी हातात हिरवे आणि लाल झेंडे हातात धरले होते.यावेळी विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.शेतकरी विरोधी कायदा रद्द करा,केंद्रातील मोदी सरकारचा निषेध असो अशी घोषणाबाजी आंदोलकांनी केली.
12:23 PM (IST)  •  08 Dec 2020

मनमाड : कृषी कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी किसान सभा आणि काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. मोर्चा काढून पुणे-इंदौर महामार्गावर रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
15:23 PM (IST)  •  08 Dec 2020

विदर्भातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती कळमना बाजारात आज बहुतांशी व्यवहार सुरु होते... सकाळी भाज्यांचे आणि दुपार पासून धान्याचे खरेदी विक्री व्यवहार सुरळीत असल्याचे आज पाहायला मिळाले.... मात्र, रोजच्या तुलनेत खरेदी विक्रीचे व्यवहार काही प्रमाणात कमी झाले... बाजारात दलाल म्हणून काम करणाऱ्या आढते वर्गाने आज बाजारात नारे निदर्शने करत केंद्र सरकार ने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांना विरोध दर्शविला... केंद्र सरकारचे नवे कायदे शेतकऱ्यांसह बाजार समितीत काम करणाऱ्या आढते वर्गाला देशोधडीला लावेल असा आरोप आंदोलकांनी केला... दरम्यान, व्यापाऱ्यांनी आजच्या भारत बंदचा नागपूरच्या कळमना बाजारात फारसा परिणाम झाला नसल्याचे मत व्यक्त केले...
13:23 PM (IST)  •  08 Dec 2020

सोलापूर - पोलिसांनी नरसय्या आडम यांचा मोर्चा रोखला, नसरय्या आडम आणि माकपच्या कार्यकर्त्यांनि रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, माकपच्या भारत बंदच्या समर्थनार्थ काढण्यात येणार होता मोर्चा, रास्ता रोको करणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलीसांची धरपकड, माजी आमदार नरसय्या आडम आणि काही कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत दारुसह किंवा पार्ट्यांचं प्रलोभन, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 8 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीत दारुसह किंवा पार्ट्यांचं प्रलोभन, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 8 कोटींचा मुद्देमाल जप्त
Divyanka Tripathi : अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात, रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया; आता प्रकृती कशी?
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात, रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया; आता प्रकृती कशी?
कुठं उष्णतेची लाट तर कुठं अवकाळीचा तडाखा, कसं असेल देशातील हवामान? सविस्तर माहिती एका क्लिकवर
कुठं उष्णतेची लाट तर कुठं अवकाळीचा तडाखा, कसं असेल देशातील हवामान? सविस्तर माहिती एका क्लिकवर
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vikas Amte Anandvan : विकास आमटे यांनी आनंदवन येथे बजावला मतदानाचा हक्कVikas Thackeray : हुकुमशाही सरकारला देशाची जनता निवडून देणार नाही - विकास ठाकरेLoksabha Election 2024 India : देशात 102 तर राज्यात जागांवर मतदानChandrapur Varora : उष्माघाताचा त्रास झाल्यास मतदानकेंद्रावर काय काळजी घ्यावी ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत दारुसह किंवा पार्ट्यांचं प्रलोभन, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 8 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीत दारुसह किंवा पार्ट्यांचं प्रलोभन, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 8 कोटींचा मुद्देमाल जप्त
Divyanka Tripathi : अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात, रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया; आता प्रकृती कशी?
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात, रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया; आता प्रकृती कशी?
कुठं उष्णतेची लाट तर कुठं अवकाळीचा तडाखा, कसं असेल देशातील हवामान? सविस्तर माहिती एका क्लिकवर
कुठं उष्णतेची लाट तर कुठं अवकाळीचा तडाखा, कसं असेल देशातील हवामान? सविस्तर माहिती एका क्लिकवर
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
ICC T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकासाठी 10 जणांची नावं जवळपास निश्चित; कोणात्या खेळाडूंचा समावेश?, पाहा
टी-20 विश्वचषकासाठी 10 जणांची नावं जवळपास निश्चित; कोणात्या खेळाडूंचा समावेश?, पाहा
Mumbai Indians Rohit Sharma Hardik Pandya: शेवटचं षटक टाकण्यासाठी आला, फक्त रोहितसोबत बोलत राहिला; हार्दिकला केले दुर्लक्ष, पाहा Video
शेवटचं षटक टाकण्यासाठी आला, फक्त रोहितसोबत बोलत राहिला; हार्दिकला केले दुर्लक्ष, पाहा Video
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Lok Sabha Election Phase 1:  लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य  'मतपेटीत' होणार बंद
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य 'मतपेटीत' होणार बंद
Embed widget