Bharat Bandh : 8 डिसेंबरला 'भारत बंद' दरम्यान काय सुरू राहणार, काय बंद?
भारत बंदच्या दिवशी सकाळी 8 ते संध्याकाळपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. यासह सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत एकूण रहदारी ठप्प होईल. अशा परिस्थितीत, जर आपण या दिवशी बाहेर जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा.
नवी दिल्ली : नव्या कृषि कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने 8 डिसेंबरला 'भारत बंद' पुकारण्यात आला आहे. गेल्या 11 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमधील पाचव्या फेरीतील बैठकीनंतर कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. अशा परिस्थितीत 8 डिसेंबरला 'भारत बंद' कसा होईल, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. यादरम्यान काय सुरू राहणार, काय बंद होणार?
'भारत बंद'ला 11 पक्षांचे समर्थन
शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला देशातील 11 राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेस, आरजेडी, ममता बॅनर्जी यांचे टीएमसी, अखिलेश यादव यांचे समाजवादी पार्टी, दिल्लीची सत्ताधारी आम आदमी पार्टी, तेलंगणची सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती आणि एनडीएची राष्ट्रीय लोकशाही पार्टी यामध्ये प्रमुख पक्षांचा समावेश आहे. राजस्थानचे खासदार आणि आरएलपीचे नेते हनुमान बेनीवाल यांनी तर 8 डिसेंबरनंतर एनडीएकडे रहायचे की नाही याबाबत आपण निर्णय घेणार असल्याचेही म्हटले आहे.
तीन वाजेपर्यंत चक्का जाम राहील रविवारी 'भारत बंद'च्या दिवशी सकाळी आठ ते संध्याकाळपर्यंत देशव्यापी बंद राहणार असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे. यासह सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत एकूण रहदारी ठप्प होईल. अशा परिस्थितीत, जर आपण या दिवशी बाहेर पडणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा. याशिवाय केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिली जाईल. रुग्णवाहिका इत्यादी अत्यावश्यक सेवांना थांबवलं जाणार नाही. याखेरीज भारत बंद दरम्यान लग्नासाठीच्या गाड्यांना न थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
8 तारीख को सुबह से शाम तक भारत बंद रहेगा। चक्का जाम शाम तीन बजे तक रहेगा। दूध-फल-सब्ज़ी पर रोक रहेगी। शादियों और इमरजेंसी सर्विसेज़ पर किसी तरह की रोक नहीं होगी: सिंघु बॉर्डर पर जय किसान आंदोलन से योगेंद्र यादव pic.twitter.com/gvc14gxSLR
— ANI_HindiNews (@AHindinews) December 6, 2020
दूध-फळ-भाजीच्या सेवेवर बंदी भारत बंदच्या दिवशी शेतकरी संघटनांनी दूध, फळे आणि भाजीपाल्याच्या सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजे तुम्हाला 8 डिसेंबरला या सेवा मिळणार नाहीत. विशेष म्हणजे, रविवारी दिल्लीत निषेध करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांचा अकरावा दिवस आहे. 8 डिसेंबरला शेतकर्यांनी भारत बंद पुकारला आहे.
केंद्र सरकारसोबत आतापर्यंत शेतकरी संघटनांच्या पाच बैठका पार पडल्या आहेत. सहावी फेरी 9 डिसेंबरला होईल. शेतकरी तीन नवीन कायद्यांचा विरोध करीत आहेत - 1. किंमत उत्पादन व कृषी सेवा कायदा 2020, 2. जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा 2020 आणि शेतकरी उत्पादन व्यापार व वाणिज्य (पदोन्नती व सुलभता) कायदा, 2020.
Delhi Farmer Protest | दिल्लीच्या टिकरी बॉर्डरवर ट्रक-ट्रॅक्टरच्या रांगा, कृषी कायद्याविरोधात आंदोलन