Belagaum: बेळगाव जिल्ह्याचे त्रिभाजन होणार, गोकाक आणि चिक्कोडी या नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव; पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांची माहिती
Karnataka News : बेळगाव हा आकाराच्या दृष्टीकोनातून कर्नाटकातील सर्वात मोठा जिल्हा असून लोकसंख्येचा विचार करता बंगळुरू शहर नंतर तो दुसरा मोठा जिल्हा ठरतो.
![Belagaum: बेळगाव जिल्ह्याचे त्रिभाजन होणार, गोकाक आणि चिक्कोडी या नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव; पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांची माहिती belgaum may divide into chikkodi gokak district karnataka minister satish jarliholi marathi news Belagaum: बेळगाव जिल्ह्याचे त्रिभाजन होणार, गोकाक आणि चिक्कोडी या नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव; पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/18/e609120c26df1973184d1cf4b4b3e8d4169237390085393_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Belgaum News : बेळगाव जिल्ह्याचा (Belagaum) तीन जिल्ह्यांत विभाजनाचा प्रस्ताव असून गोकाक (Gokak) आणि चिक्कोडी (Chikkodi) या दोन नव्या जिल्ह्यांचा प्रस्ताव राज्य सरकारसमोर असल्याचं पालकमंत्री सतीश जारकिहोळी (Satish Jarliholi) यांनी सांगितलं आहे. बेळगाव जिल्ह्याचा विस्तार मोठा असून प्रशासनाच्या सुलभीकरणासाठी हा प्रस्ताव असल्याचं ते म्हणाले. तसेच बेळगाव तालुक्याचेही दोन तालुक्यांमध्ये विभाजन करण्याचा प्रस्तावही असल्याचं त्यांनी सांगितलं. बेळगाव जिल्ह्याचा आकार हा मोठा असून प्रशासकीय दृष्टीकोनातून लोकांच्या गैरसोयीचा असल्याची तक्रार अनेकदा केली जाते. त्यामुळे या जिल्ह्याचे विभाजन करण्यासाठी आता सरकारी स्तरावरून हालचाली सुरू असल्याचं दिसतंय.
बेळगाव जिल्ह्याचे तीन जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्यापूर्वी त्यावर लोकांचे आणि तज्ज्ञांचे मत घेतलं जाणार आहे. त्यानंतर विभाजनाचा हा प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी केंद्राकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती सतीश जारकिहोळी यांनी दिली.
बेळगाव जिल्ह्यातून गोकाक आणि चिक्कोडी या दोन नव्या जिल्ह्यांची निर्मिती करावी अशी मागणी करत जिल्ह्यातील सर्व आमदारांनी मुख्यमंत्री सिद्धारमय्या (Karnataka CM Siddaramaiah) यांची भेट घेतली असून मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
कर्नाटकातील सर्वात मोठा जिल्हा
बेळगाव जिल्ह्याचा विस्तार हा जवळपास 13,000 स्क्वेअर किमी इतका आहे. आकाराच्या दृष्टीकोनातून बेळगाव हा कर्नाटकातील सर्वात मोठा जिल्हा आहे. 2011 सालच्या जनगणनेनुसार, बेळगाव जिल्ह्याची लोकसंख्या ही 47.8 लाख इतकी आहे आणि 2023 सालची लोकसंख्या ही 54.2 लाख इतकी असल्याचं सांगितलं जातंय. लोकसंख्येनुसार बेळगाव हा बंगळुरू शहर (Bengaluru Urban) जिल्ह्यानंतर दुसरा मोठा जिल्हा आहे.
बेळगाव तालुक्याचंही विभाजन होणार
बेळगाव तालुक्यामध्ये विधानसभेच्या तीन जागा असून या तालुक्याची लोकसंख्या ही 12 लाखांच्या जवळपास आहे. त्यामुळे या तालुक्याचे दोन तालुक्यांमध्ये विभाजन करण्याचाही प्रस्ताव असल्याचं पालकमंत्री सतीश जारकिहोळी (Satish Jarliholi) यांनी सांगितलं.
बेळगावात 18 विधानसभेच्या जागा आहे. तसेच जिल्ह्यामध्ये 14 तालुके आणि 506 ग्रामपंचायती तसेच 13,80 खेडी आहेत. बेळगाव जिल्ह्यातील नागरिक हे बेळगाव, चिक्कोडी आणि उत्तर कन्नड या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान करतात.
बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव पहिल्यांदा 1997 साली आला. तेव्हापासून आजतायायत याचा अंतिम निर्णय झाला नाही. बेळगाव हे कर्नाटकातील महत्त्वाचं मेडिकल आणि शैक्षणिक केंद्र आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)