(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आजपासून तीन दिवस बँका बंद, वेतन सुधारणेच्या प्रलंबित मागणीसाठी संप
आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारमण शुक्रवारी संपाच्या पहिल्याच दिवशी संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आहेत. बँक संघटनांनी 20 टक्के वेतनवाढीची मागणी केली आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्व सरकारी बँका आज आणि उद्या संपावर गेल्या आहेत. वेतन सुधारणेच्या प्रलंबित मागणीवर कोणतीही सहमती झाली नाही. त्यामुळे संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आज आणि उद्या सरकारी बँका बंद राहणार आहेत. याशिवाय संपाला जोडून रविवारची सुटी असल्यानं सलग तीन दिवस बँकांचे व्यवहार कोलमडण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे उद्या केंद्रीय अर्थसंकल्प असताना सर्व सरकारी बँका संपावर असतील. बँक संघटनांनी 20 टक्के वेतनवाढीची मागणी केली आहे.
भारतीय स्टेट बँकेसह इतर काही बँकांनी याबाबत माहिती दिली आहे. सलग दोन दिवस चालणाऱ्या या संपामुळे कामकाजावरही परिणाम झाल्याचे दिसून येणार आहे. तसेच एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होणार असून नेमका त्याच दिवशी सर्व सरकारी बँका संपावर असणार आहेत.
वेतन सुधारणेच्या प्रलंबित मागणीबाबत भारतीय बँक महासंघ अर्थातच आयबीए या बँक व्यवस्थापनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळाशी चर्चेत कोणत्याही मागणीवर सहमती न झाल्याने बँक कर्मचाऱ्यांनी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, बँक कर्मचारी शुक्रवारपासून देशव्यापी संपावर गेले आहेत. त्यामुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस बँकाचे व्यवहार विस्कळीत होण्याची चिन्ह दिसून येत आहेत. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कर्मचाऱ्यांची वेतन सुधारणा नोव्हेंबर 2017 पासून प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ दोन दिवस संप होणार आहे.
आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारमण शुक्रवारी संपाच्या पहिल्याच दिवशी संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आहेत. बँक संघटनांनी 20 टक्के वेतनवाढीची मागणी केली आहे. दरम्यान दोन दिवसांच्या संपाची घोषणा केल्यानंतर संघटनेच्या प्रतिनिधींची सोमवारी मुख्य कामगार आयुक्तांबरोबर बैठक झाली. परंतु, कोणताही तोडगा न निघाल्यामुळे संप कायम राहणार असल्याची माहिती 'ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन'चे अध्यक्ष सुनील कुमार यांनी दिली. तसेच 'आयबीए'कडून वेतनवाढीबाबत कोणतंही आश्वासन न मिळाल्यामुळे कर्मचारी संघटनांची तक्रार असल्याचं 'अखिल भारतीय बँक एम्प्लॉइज असोसिएशन'चे सरचिटणीस सी. एच. व्यंकटचलम यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
Budget 2020 | आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपतींच्या अभिभाषणाकडे सर्वांचं लक्ष
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा यंदाचा अखेरचा अर्थसंकल्प?
अर्थव्यवस्थेवरुन जनतेचा विश्वास उडाला, ग्राहकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेतही घसरण
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक मोदी सरकारला घेरण्याच्या तयारीत