एक्स्प्लोर
Advertisement
शिवसेनेच्या अयोध्येतील सभेमुळे स्थानिक मुस्लिमांमध्ये भीतीचे वातावरण
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. परंतु त्यापूर्वीच अयोध्येतील मुस्लीम जनतेत भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे.
अयोध्या : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा सुरु होण्यापूर्वीच त्यावरुन वाद सुरु झाले आहेत. रामजन्मभूमी वादातील याचिकाकर्ते इक्बाल अ्सारी यांनी अयोध्येत हिंसाचार होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, उद्धव ठाकरे अयोध्येत सभा घेणार असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होईल. त्यामुळे हिंसाचार आणि तोडफोड होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी 24 नोव्हेंबर रोजी अयोध्येत सभेचे आयोजन केले आहे.
अन्सारी म्हणाले की, "अयोध्येत मोठी गर्दी उसळली तर काय होईल ते सांगणे शक्य नाही. आम्ही इथे अल्पसंख्यांक आहोत. त्यामुळे आम्ही घाबरलो आहोत. इथे तेच लोक जमणार आहेत, ज्यांनी 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली होती. त्यावेळी एकही मुस्लीम व्यक्ती मशीद वाचवण्यासाठी जाऊ शकली नाही. तरिदेखील इथल्या मुस्लीम लोकांची घरे लुटली गेली, लोकांच्या घरांची तोडफोड करण्यात आली. आता ते लोक पुन्हा इथे येणार आहेत. त्यामुळे अयोध्येत राहणारे अल्पसंख्यांक मुस्लीम लोक आणि मी घाबरलो आहे. जर आम्हाला संरक्षण मिळाले नाही, तर आम्ही अयोध्या सोडून दुसरीकडे जाऊ.
अन्सारी म्हणाले की, अयोध्येत गर्दी वाढली तर, आमचे नुकसान होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जर आमचे नुकसान झाले तर, त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement