CJI विरोधात ट्वीट महागात! अॅटर्नी जनरल यांची कुणाल कामराविरोधात न्यायालयीन कारवाई करण्यास संमती
अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी कुणाल कामरा याच्याविरोधात न्यायालयीन अवमान प्रक्रिया सुरू करण्यास सहमती दिली आहे.
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांच्याविरूद्ध केलेल्या ट्विटमुळे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या आहेत. अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी कुणाल कामराविरोधात न्यायालयीन अवमान प्रक्रिया सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. अॅटर्नी जनरल यांनी कॉमेडियन कुणाल कामरा याच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यास सहमती देणारे लेखी पत्र दिले आहे. यापूर्वी कुणाल कामराविरोधात एका ट्विटसाठी अवमान कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
कॉमेडियन कुणाल कामरा ट्विटरवर अर्णब गोस्वामीबद्दल खूप आक्रमक आहे. याअगोदर, 12 नोव्हेंबरला अॅटर्नी जनरल यांनी अर्नब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम जामिनावरील ट्विटवरून अवमान प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली आहे. अॅटर्नी जनरल यांनी कुणालचे ट्विट बरेच आक्षेपार्ह असल्याचे म्हटले होते. त्यानंतर कॉमेडियनच्या अडचणी वाढल्या आहेत.
Attorney General KK Venugopal grants consent to initiate contempt of court proceedings against comedian Kunal Kamra for his latest tweet on Chief Justice of India (CJI) Sharad Arvind Bobde. pic.twitter.com/u2qJBkC1Zt
— ANI (@ANI) November 20, 2020
अगोदरचं अवमान कारवाई सुरु असूनही कुणाल कामारा माघार घेताना दिसत नाहीय. 18 नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्याबद्दलच्या आणखी एका ट्विटनंतर अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी कुणालच्या विरोधात कोर्टाची कार्यवाही सुरू करण्याचे मान्य केले आहे.
Kunal Kamra | कुणाल कामरा विरोधात न्यायालय अवमानप्रकरणी खटला चालणार