Assembly Elections 2022 : हिमाचलच्या निवडणुका जाहीर मात्र गुजरातच्या का नाहीत? विरोधकांचे निवडणूक आयोगाला प्रश्न
निवडणूक आयोगानं हिमाचल विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. मात्र, गुजरात विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या नाहीत. यावरुन निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) हिमचाल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकींची (Himachal Pradesh Election) घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेची निवडणूक एकाच टप्यात होणार आहे. गुजरामध्येही (Gujarat) यावर्षी निवडणुका होणार आहेत, मात्र तिथल्या तारखा अद्याप निवडणूक आयोगानं जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळं निवडणूक आयोगावरही काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आयोगानं देखील नियमांचं उल्लंघन केलं असल्याचं म्हटलंय.
2017 मध्ये नोव्हेंबरमध्ये दोन्ही राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आणि डिसेंबरमध्ये एकाच वेळी निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र, गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान झाले होते, त्यामुळं निवडणूकआयोगावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन केलं नसल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. दोन्ही राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ संपण्याच्या कालावधीत 40 दिवसांचा फरक असल्याचे राजीव कुमार म्हणाले. तो कालावधी किमान 30 दिवसांचा असावा जेणेकरून एकाच्या निकालाचा दुसऱ्यावर परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले. निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यापूर्वी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. हिमाचल प्रदेश हा डोंगराळ प्रदेश आहे. त्यामुळे बर्फवृष्टीपूर्वी राज्यात निवडणुका व्हाव्यात, अशी निवडणूक आयोगाची इच्छा आहे. त्यामुळं आयोगानं नियमांचे उल्लंघन केलं नसल्याचे राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.
गुजरात आणि हिमाचल प्रदेशात नेहमीच नेहमीच एकाच वेळी निवडणुका होत आल्या आहेत. दोन्ही राज्यांच्या निवडणुकांच्या तारखाही एकाच वेळी ठरतात. त्यामुळं निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित होत आहेत. 2017 मध्ये नोव्हेंबरमध्ये दोन्ही राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आणि डिसेंबरमध्ये एकाच वेळी निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र, गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान झाले होते. दुसरीकडे, हिमाचलबद्दल बोलायचे झाले तर, यावेळी 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना 17 ऑक्टोबर रोजी जारी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर असून 29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित
1) निवडणूक आयोगाने हिमाचल निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याने आता विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. अखेर, दोन्ही राज्यात एकाच वेळी तारखा का जाहीर झाल्या नाहीत?
2) आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विद्यमान सरकारला अधिक कल्याणकारी योजना सुरू करण्याची संधी मिळावी म्हणून गुजरात निवडणुकीच्या तारखा उशिरा जाहीर केल्या जात असल्याचे विरोधी पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
3) हिमाचल प्रदेशमधील निवडणुकांच्या तारखा 13 ऑक्टोबरला आणि गुजरातच्या निवडणुका 12 दिवसांनी 25 ऑक्टोबरला जाहीर झाल्या असताना 2017 मधील परिस्थिती यावेळची परिस्थिती वेगळी असल्याचे सांगत विरोधकही प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यानंतर पूरस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगानं म्हटलं आहे.
5) 2012 मध्ये एकाचवेळी निवडणुका जाहीर झाल्या. 2017 मध्ये केवळ अपवादात्मक परिस्थितीचा हवाला देऊन वेगवेगळ्या वेळी निवडणुका झाल्या. विरोधकांचे म्हणणे आहे की, गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींच्या सर्व सभा आणि सभांचे नियोजन आधीच करण्यात आले आहे. पीएम मोदींच्या 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या रॅलीबाबत विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
5) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या सर्व सभा संपल्यानंतर आणि योजनांचे उद्घाटन केल्यानंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यास निवडणूक आयोगाला सांगतील असे विरोधकांनी म्हटलं आहे. विरोधकांनी आता थेट निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: