Asaduddin Owaisi:पाकिस्तानात जाण्यास नकार देणारी टीम पाकविरुद्ध सामने खेळते, असदुद्दीन ओवैसींकडून भारत-पाकिस्तान सामन्यावर प्रश्न उपस्थित
Asaduddin Owaisi On India-Pak Match: एकीकडे भारतीय संघ पाकिस्तानात (Pakistan) खेळण्यासाठी जात नाहीआणि दुसरीकडे पाकिस्तानविरुद्ध सामने खेळले जातात असं वक्तव्य ओवैसी यांनी केलंय.
![Asaduddin Owaisi:पाकिस्तानात जाण्यास नकार देणारी टीम पाकविरुद्ध सामने खेळते, असदुद्दीन ओवैसींकडून भारत-पाकिस्तान सामन्यावर प्रश्न उपस्थित Asaduddin Owaisi Team refuses to go to Pakistan to play matches against Pakistan Asaduddin Owaisi questions India-Pakistan match Asaduddin Owaisi:पाकिस्तानात जाण्यास नकार देणारी टीम पाकविरुद्ध सामने खेळते, असदुद्दीन ओवैसींकडून भारत-पाकिस्तान सामन्यावर प्रश्न उपस्थित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/14/c0a806e1cf69bab0fda628beeb9f55bd1665755756393224_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Asaduddin Owaisi On India-Pak Match: क्रिकेटच्या मैदानावर उद्या भारत आणि पाकिस्तानचा सामना रंगणार आहे. मात्र या मॅचपूर्वीच राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी भारत-पाकिस्तान सामन्यावर प्रश्न उपस्थित केलाय. एकीकडे भारतीय संघ पाकिस्तानात (Pakistan) खेळण्यासाठी जात नाही आणि दुसरीकडे पाकिस्तानविरुद्ध सामने खेळले जातात असं वक्तव्य ओवेसी यांनी केलंय.
एका सभेला संबोधित करताना ओवैसी म्हणाले, जितक्या वेळा पाकिस्तानचा उल्लेख हे करतात तेवढा तर आम्ही आमच्या संपूर्ण जीवनात केला नसेल. एकीकडे भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यासाठी जात नाही आणि दुसरीकडे आम्ही पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रलियामध्ये सामना खेळत आहे. जर आम्ही पाकिस्तानबरोबर सामना नाही खेळलो तर काय होणार? वाहिन्यांचे हजार दोन हजार कोटीचे नुकसान होईल. देशापेक्षा मॅच मोठी आहे का?
ओवैसी पुढे म्हणाले, या सामन्यात भारताला विजय मिळावा अशी माझी देखील इच्छा आहे. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने पाकिस्तानचा पराभव करावा अशी आमची देखील इच्छा आहे.
दरम्यान ओवैसी यांनी पराभवानंतर मुस्लिम खेळाडूंच्या ट्रोलिंगचा मुद्दा देखील उपस्थित केला. ओवैसी म्हणाले, विजयानंतर देशात मोठा जल्लोष केला जातो, खेळाडूंचे कौतुक केले जाते. परंतु पराभावानंतर मात्र चूका शोधल्या जातात. खेळाडूंना ट्रल केले जाते.
दरम्यान ओवैसी यांनी पराभवानंतर मुस्लिम खेळाडूंच्या ट्रोलिंगचा मुद्दा देखील उपस्थित केला. ओवैसी म्हणाले, विजयानंतर देशात मोठा जल्लोष केला जातो, खेळाडूंचे कौतुक केले जाते. परंतु पराभावानंतर मात्र चूका शोधल्या जातात. खेळाडूंना ट्रोल केले जाते.
काय आहे प्रकरण?
BCCI चे सचिव जय शहा म्हणाले होते की, भारतीय संघ क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणर नाही. त्यानंतर पाकिस्तानने देखील प्रतिक्रिया दिली होती. तर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले होते, भारतीय संध आशिया कपसाठी पाकिस्तानात जाणार की याचा अंतिम निर्णय गृहमंत्रालय घेणार आहे
भारत आणि पाकिस्तान 23 ऑक्टोबरला आमने-सामने
भारत त्यांचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 23 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. हा सामना ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, या सामन्याला दुपारी 1.30 वाजता सुरुवात होईल. या सामन्यार पावसाचे सावट आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी पावसाची शक्यता आहे. पावसाने सामन्याच्या दिवशी हजेरी लावली तर बदल करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या:
T20 World Cup: 2021 च्या टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघात नेमके कोणते बदल झाले? कर्णधार रोहित शर्मा म्हणतोय...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)