एक्स्प्लोर
फक्त अपर्णा यादव यांच्या गोशाळेला 86 टक्के निधी!
लखनऊ : अपर्णा यादव यांच्यावर अखिलेश यादव सरकार किती मेहरबान झालं होतं, हे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील गोसेवा आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 2012 ते 2017 या अखिलेश सरकारच्या काळात अपर्णा यादव यांच्या गोशाळेला भरभरुन निधी देण्यात आला.
अपर्णा यादव या उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यांच्या भावाची म्हणजे प्रतिक यादव यांची पत्नी आहेत.
तीन वर्षात 56 टक्के निधी
माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश गोसेवा आयोगाने अखिलेश सरकारच्या काळात गोशाळांना दिलेल्या निधीमधील 86 टक्के निधी अपर्णा यादव यांच्या गोशाळेला देण्यात आला.
2012 ते 2017 या काळात अखिलेश सरकारने उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या गोशाळांना एकूण 9 कोटी 66 लाख रुपयांचा निधी वाटप केला. यातील 8 कोटी 35 लाख रुपये एकट्या अपर्णा यादव यांच्या गोशाळेला देण्यात आला होता.
कोणत्या वर्षी किती निधी?
- 2012-13 - 49 लाख 89 हजार रुपये
- 2013-14 - 1 कोटी 25 लाख रुपये
- 2014-15 - 1 कोटी 41 लाख रुपये
- 2015-16 – 2 कोटी 58 लाख रुपये
- 2016-17 – 2 कोटी 55 लाख रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement