एक्स्प्लोर
गुरुग्राममध्ये विद्यार्थ्याच्या हत्येनंतर लोकांचा भडका, शाळेबाहेर जाळपोळ
प्रद्युम्नच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेऊन लोकांना शांततेचं आवाहन केलं. तसंच शाळा प्रशानाच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्नही उपस्थित केले.
नवी दिल्ली : दिल्लीजवळील गुरुग्राममधल्या रायन इंटरनॅशनल स्कूलविरोधात आजही जोरदार निर्दशनं झाली. लोकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी यावेळी लाठीचार्जही केला. तर काही संतप्त लोकांनी शाळेजवळचं एक दारुचं दुकानही पेटवून दिलं.
7 वर्षांच्या प्रद्युम्न ठाकूर नावाच्या मुलाची शाळेतच हत्या झाल्यानं हा वाद पेटला आहे. स्कूलबसचा कंडक्टरनं लैंगिक शोषन करुन प्रद्युम्नच्या हत्या केली असा आरोप आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात शाळा प्रशासनाची भूमिकाही संशयाच्या घेऱ्यात आहे. याप्रकरणी शाळेच्या प्राचार्यांनाही निलंबित केलं गेलं आहे.
आज याबाबत प्रद्युम्नच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेऊन लोकांना शांततेचं आवाहन केलं. तसंच शाळा प्रशानाच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्नही उपस्थित केले.
संबंधित बातमी : लैंगिक शोषणानंतर 7 वर्षांच्या मुलाची गळा चिरुन हत्या, बस कंडक्टर अटकेत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement