आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू, नेमकी कशी घडली घटना?
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम (Andhra Pradesh Srikakulam ) जिल्ह्यातील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडलीय.
Andhra Pradesh Srikakulam Stampede : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम (Andhra Pradesh Srikakulam ) जिल्ह्यातील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडलीय. यामध्ये 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. कार्तिक एकादशीनिमित्त दर्शनासाठी मोठ्या संख्येनं मंदिरात भाविक जमा झाल्यामुळं ही घटना घडली आहे.
घटनास्थळाचे अनेक भयावह फोटो सोशल मीडियावर व्हायरल
या घटनेचे आणि घटनास्थळाचे अनेक भयावह फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समोर आले आहेत, व्हिडिओमध्ये मंदिराकडे जाणाऱ्या अरुंद मार्गाच्या रेलिंगमध्ये अडकलेले लोक जीव मुठीत धरून धावताना दिसत आहेत. एकादशीच्या पूजेसाठी मंदिरात जात असलेल्या अनेक महिला ओरडताना दिसत आहेत. तसेच काही महिलांच्या हातात पुजेचे साहित्य दिसत आहे. शिवाय, चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांना रुग्णवाहिकांमध्ये नेले जात असल्याचेही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे जेणेकरून त्यांना वेळेवर जवळच्या रुग्णालयात उपचार करता येतील. यामधील अनेकजण गंभीर जखणी असल्याची माहिती
नेमकी कशी घडली घटना?
आंध्र प्रदेशमधील हा अपघात कार्तिक महिन्यातील एकादशीच्या पवित्र प्रसंगी घडला. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती. प्राथमिक अहवालानुसार, मंदिर परिसराच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक गर्दीचा दबाव वाढला, ज्यामुळे लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. अनेकजण खाली कोसळले आणि त्यांच्या अंगावरुन अनेकांनी जाण्यास सुरुवात केली. माहिती मिळताच प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाने परिस्थितीवर कडक नजर ठेवली असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.
पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे गर्दी नियंत्रणाबाहेर, प्रत्यक्षदर्शींनी सांगितली माहिती
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सकाळपासूनच मंदिरात गर्दी वाढली होती आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. स्थानिक प्रशासनाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या घनेवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मी मृतांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. मी अधिकाऱ्यांना जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. मी स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना घटनास्थळी भेट देऊन मदत कार्यावर लक्ष ठेवण्यास सांगितल्याचे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
श्रीकाकुलममधील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरीत 9 भाविकांचा अंत; देवाच्या पायरीवर पुन्हा एकदा मृत्यूचं थैमान
























