एक्स्प्लोर

Sharad Pawar on Farmers: राज्य सरकारची शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करण्याची तयार नसल्याने काळी दिवाळी साजरी करावी लागतेय: शरद पवार

Sharad Pawar on Farmers: मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून देण्यात येणारी मदत पुरेशी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस काळी दिवाळी साजरी करणार.

Sharad Pawar on Farmers: मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची दानत नाही. त्यामुळे आमच्या पक्षाला आज राज्यभरात काळी दिवाळी (Diwali 2025) साजरी करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. मला असे वाटते की, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. मला यामध्ये राजकारण आणायचे नाही. पण पूरग्रस्त भागातील लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. आम्ही तशी तयारी राज्य सरकारकडे दाखवली. पण शेतकरी (Farmers) आणि पूरग्रस्तांना (Flood) मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची तयारी आतापर्यंत तरी दिसून आलेली नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. ते शुक्रवारी बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

आजचा जो दिवस आहे या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सगळ्या संघटनेच्या सहकाऱ्यांनी बसून एक निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे आजचा दिवस साजरी करायची नाही. त्याचं महत्त्वाचं कारण गेले महिनाभर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी होती. काही ठिकाणी पूर काही ठिकाणी महापूर होता. याच्यामध्ये शेती उद्ध्वस्त झाली आहे. तिथली जमिनी खरडून गेली आहे. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. त्याच्यादृष्टीने शेतीची जमीन हे त्याचे सर्वस्व आहे. त्याचे सर्वस्व वाहून गेले आहे. कोणत्या मनस्थितीत तो दिवाळी साजरी करणार? म्हणून त्याच्या दुःखात आमच्या संघटनेने सहभाग घ्यायचा निर्णय घेतला. संकट येतात पण अशावेळी ज्यांच्या हातात राज्याची देशाची सत्ता आहे त्यांची जबाबदारी असते लोकांना संकटातून बाहेर काढणे हातभार लावायचा. आजच्या राज्य सरकारने काही तोतडी रक्कम काही लोकांना जाहीर केली. पण नुकसानीच स्वरूप बघितलं तर या तोकड्या रकमेचा उपयोग त्याला पुन्हा उभा करण्यासाठी होईल असं वाटत नाही. त्यामुळे राज्य सरकारवर सुद्धा हा संकटग्रस्त नाराज आहे. मी एवढं सांगू इच्छितो की, हे जे काही घडतंय ते दुःखद आहे, त्याबाबत मला अधिक भाष्य करायचे नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

Purandar Airport: पुरंदर विमानतळामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळाली पाहिजे: शरद पवार

यावेळी शरद पवार यांनी पुरंदर विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांकडून होणाऱ्या विरोधाबाबत भाष्य केले. मोबदला हा विषय नाही. काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, विमानतळाची जागा बदला. हा निर्णय मी किंवा सरकारी अधिकारी घेऊ शकत नाहीत. हा केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. विमानतळ कुठे काढायचं हा निर्णय शेवटी केंद्र सरकार घेईल.प्रश्न असा आहे जिथे विमानतळ बांधण्यात येईल, तेथील  शेतकऱ्यांची शेती ताब्यात घेतली जाईल. अशा सर्वांचे पुनर्वसन आणि नुकसान भरपाई कशी दिली जाईल याबाबत शेतकरी वर्गात अस्वस्थता आहे. चर्चेत मी एवढंच सांगितलं कोणीही गैर कायद्याने शेतकऱ्यांची जमीन काढू शकत नाही. त्यांना योग्य ती नुकसान भरपाई आणि पर्यायी जमीन द्याव्यात ही त्यांची मागणी होती. मी मुख्यमंत्री पालकमंत्री यांना विनंती करणार आहे की, तुम्ही या कामाच्या संदर्भात लोकांचे उपस्थितीत यातून काहीतरी मार्ग काढा. दिवाळी संपल्यावर मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेईल ते सांगतील तेव्हा या विषयावर बोलू, असे शरद पवार यांनी सांगितले.

आणखी वाचा

मुख्यमंत्री एवढा लबाड कसा बोलतोय, शेतकरी तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाहीत, बच्चू कडूंचा 'प्रहार'

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
Gold : सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Onion Export Crisis: कांद्यामुळे शेतकरी हवालदिल, निर्यातबंदीवर तोडगा कधी?
TOP 25 Superfast News | टॉप 25 वेगवान घडामोडी | Maharashtra News |  ABP Majha
JCB Wedding : कोल्हापुरात JCB मधून नवदाम्पत्याची वरात, हटके मिरवणुकीची जोरदार चर्चा
Manoj Jarange Sumons: आझाद मैदानातील आंदोलन प्रकरणी मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचं समन्स
Kapaleshwar Mandir Sanjay Raut : कपालेश्वर मंदिरात नाशिकमध्ये संजय राऊतांसाठी पूजा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
Gold : सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
Tanaji sawant: येत्या निवडणुकीला सर्वधर्म समभाव; तानाजी सावंतांकडून एकला चलो रे चा नारा, महायुतीत उभी फूट
येत्या निवडणुकीला सर्वधर्म समभाव; तानाजी सावंतांकडून एकला चलो रे चा नारा, महायुतीत उभी फूट
Elon Musk Pay Package: एलाॅन मस्कना टेस्लानं दिलेला पगार किती ट्रिलीयन डाॅलर? तेवढ्यात स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्रायलसारखं किती देश खरेदी होतील??
एलाॅन मस्कना टेस्लानं दिलेला पगार किती ट्रिलीयन डाॅलर? तेवढ्यात स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्रायलसारखं किती देश खरेदी होतील??
Samantha Ruth Prabhu: समंथाला अखेर 'तो' मिळाला! म्हणाली, 'गेल्या दीड वर्षात मी माझ्या करिअरमध्ये काही धाडसी पावलं उचलली, ही फक्त सुरुवात आहे'
समंथाला अखेर 'तो' मिळाला! म्हणाली, 'गेल्या दीड वर्षात मी माझ्या करिअरमध्ये काही धाडसी पावलं उचलली, ही फक्त सुरुवात आहे'
लोकलच्या मोटरमनला लॉबीतच अडवले; प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रेल्वे कर्मचारी संघटनांची सीसीटीव्हीतून पोल खोल
लोकलच्या मोटरमनला लॉबीतच अडवले; प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रेल्वे कर्मचारी संघटनांची सीसीटीव्हीतून पोल खोल
Embed widget