एक्स्प्लोर
Raj - Uddhav Thackeray ठाकरे बंधू पुन्हा एकत्र, मनसेच्या दिपोत्सवाचं उद्धव ठाकरे करणार उद्घाटन
माजी मुख्यमंत्री Uddhav ठाकरे आणि मनसे अध्यक्ष Raj ठाकरे हे आज शिवाजी पार्क येथे दीपोत्सवाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येणार आहेत. या सोहळ्याचं उद्घाटन Uddhav ठाकरे यांच्या हस्ते होणार असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या ऐतिहासिक भेटीकडे लागले आहे. 'आम्ही एकत्र येऊ शकतो', असं Uddhav ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात स्पष्टपणे म्हटलं होतं, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मागील काही महिन्यांत दोन्ही बंधूंमध्ये सहा वेळा भेटी झाल्या असून, आता औपचारिकतेचीच प्रतीक्षा असल्याचं नेत्यांकडून सांगितलं जातंय. यंदाच्या दीपोत्सवात दोन्ही बंधू एकत्र येत असल्याने महाराष्ट्रातील राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता वर्तवली जात आहे. या कार्यक्रमात विविध नेते सहभागी होणार असून, यंदा दीपोत्सव दहा दिवसांचा असणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

















