Shivajirao Kardile Passes Away: दूध व्यवसाय, मंडळाचा कार्यकर्ता, सरपंच ते सत्तेच्या शिखरापर्यंत; शिवाजीराव कर्डिलेंचा राजकीय प्रवास
Shivajirao Kardile Passes Away: दूध व्यवसायातून राजकारणात प्रवेश करत कर्डिले यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, आणि भाजप असा प्रवास करत त्यांनी नगर जिल्ह्यात आपले स्वतंत्र राजकीय घराणे निर्माण केले.

Shivajirao Kardile Passes Away: भाजप आमदार, ज्येष्ठ नेते शिवाजीराव भानुदास कर्डीले (वय 67) यांचे आज (17 ऑक्टोबर) ह्रदयविकाराने निधन झाले. पहाटे त्यांना त्रास होऊ लागल्याने अहिल्यानगर येथील साईदीप सह्याद्री रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. आमदार शिवाजीराव कर्डिले हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होत.
राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पशा आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांचं असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकदा आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी केलेलं लोकाभिमुख… pic.twitter.com/IKXzPNmG8t
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 17, 2025
कोण होते शिवाजीराव कर्डिले? (Kardile political career)
नगर (आता अहिल्यानगर) जिल्ह्यातील बोऱ्हानगरसारख्या ग्रामीण भागातून राजकीय श्रीगणेशा केलेल्या कर्डिले यांचा राजकीय प्रवास अत्यंत खडतर राहिला. नेवासा-राहुरी विधानसभा मतदारसंघाचे पाचवेळा आमदार राहिलेले शिवाजीराव कर्डिले यांचा प्रवास हा साध्या दूध व्यवसायिकापासून प्रभावशाली राजकारणी होण्यापर्यंत झाला. बोऱ्हानगर या गावातून त्यांनी दूध गोळा करून विक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि याच माध्यमातून त्यांनी गावातील सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. बाणेश्वर तरुण मंडळाच्या कार्यातून सामाजिक ओळख निर्माण करत त्यांनी सरपंच पदावर पाऊल ठेवले.
Shivajirao Kardile Passed Away भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन,हृदयविकाराच्या धक्क्याने निधन #ABPMajha #ShivajiraoKardile pic.twitter.com/RTzCDvISIL
— ABP माझा (@abpmajhatv) October 17, 2025
अपक्ष म्हणून आमदार होण्याची संधी मिळाली (Shivajirao Kardile news)
काँग्रेसमधील स्थानिक बंडाळीचा फायदा घेत कर्डिले यांना अपक्ष म्हणून आमदार होण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. कालांतराने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि शेवटी भाजप अशा पक्षांमधून राजकीय प्रवास करत राजकीय स्थान पक्के केले. नगर जिल्ह्यातील जमिनींच्या वाढत्या किमती आणि बांधकाम क्षेत्रातील तेजीचा त्यांनी चतुराईने फायदा घेत स्वतःचे आर्थिक साम्राज्य उभे केले. थोरात आणि विखे पाटील घराण्यांच्या वैरातून निर्माण झालेल्या राजकीय पोकळीचा फायदा घेत कर्डिले यांनी तालुक्यात आपले घराणे उभे केले. मात्र त्यांच्या या प्रवासावर वाद आणि गुन्हेगारी आरोपांची छाया कायम राहिली. राजकीय चातुर्याच्या जोरावर त्यांनी नगर जिल्ह्याच्या सत्तेच्या सारीपाटावर ठसा उमटवला.
इतर महत्वाच्या बातम्या


















