एक्स्प्लोर

बिहारची रणधुमाळी संपायच्या आधी भाजपचं मिशन बंगाल सुरु, अमित शाह 5 नोव्हेंबरला पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर

बिहारची रणधुमाळी संपायच्या आधीचं भाजपचं मिशन बंगाल सुरु झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 5 नोव्हेंबरला पश्चिम बंगाल राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

नवी दिल्ली : एकीकडे बिहार निवडणुकीची धामधूम अजून संपलेली नसतानाच भाजपचं मिशन बंगाल सुरु होतंय. बिहारच्या प्रचारापासून दूर राहिलेले अमित शाह हे 5 नोव्हेंबरला दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर असणार आहेत. बंगालमध्ये पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला निवडणुका होत आहेत. त्या दृष्टीनं भाजपच्या मिशन बंगालची रणनीती आखण्यासाठी अमित शाह हे बंगालमध्ये जाणार आहेत.

बांकुरा आणि कोलकाता या दोन्ही ठिकाणी भेट देऊन ते पक्षातल्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून प. बंगालच्या भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसीची चर्चा सुरु झाली आहे. मागच्या महिन्यात भाजपनं राष्ट्रीय कार्यकारिणीची रचना जाहीर केली, त्यात बंगालमधून भाजपचे ज्येष्ठ नेते राहुल सिन्हा यांना वगळून तृणमूलमधून आलेले मुकुल रॉय यांना स्थान देण्यात आलं. मुकूल रॉय हे एकेकाळी ममता बॅनर्जी यांच्या काळात तृणमूलमध्ये नंबर 2 मानले जात होते. या सगळ्या निवडीनंतर बंगाल भाजपमध्ये पदाधिकाऱ्यांमधल्या असंतोषाची चर्चा सुरु झाली होती. आधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे बंगालचा दौरा करणार होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी अचानक त्यांच्याऐवजी थेट अमित शाहच बंगालमध्ये पोहचत असल्याचं भाजपच्या वतीनं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे बंगालमधल्या संघटनात्मक बांधणीकडे वेळीच लक्ष देण्यासाठी भाजप गंभीर असल्याचा संदेशही दिला जातोय.

Bihar Election 2020 : बिहारच्या जनतेने घराणेशाहीला नाकारलं, जंगलराजचाही पराभव; पंतप्रधानांचा विरोधकांवर निशाणा

अमित शाह यांच्या या दौऱ्याचं एका वेगळ्या अर्थानंही महत्व आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये अमित शाह हे दिल्लीच्या बाहेर फारसे पडलेले नाहीत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ते एकही दिवस हजर नव्हते. त्यानंतर बिहारच्या प्रचारात सुरुवातीला ते 12 सभा घेतील अशी चर्चा रंगली होती. मात्र, बिहारमध्ये अमित शाह यांची एकही सभा झाली नाही. मात्र, आता भाजपच्या मिशन बंगालसाठी अमित शाह स्वत: मैदानात उतरतायेत. बंगालमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं 42 पैकी 18 जागा जिंकल्या. त्यामुळे 2021 च्या विधानसभा निवडणुकीचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवत भाजपनं आत्तापासूनच कंबर कसली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची मतं एकगठ्ठा मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची मतं एकगठ्ठा मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Embed widget