(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amca Fighter Jet : भारत बनवणार स्टेल्थ फायटर जेट्स, संरक्षण राज्यमंत्र्यांची माहिती
Amca Fighter Jet : एमका या लढाऊ विमानाचे अद्यावत स्टेल्थ फायटर जेट्स बनवण्यासाठी प्रोटोटाइप डिझाइन आणि मॉडेलसाठी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीकडून मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Amca Fighter Jet : एमका या लढाऊ विमानाचे अद्यावत स्वदेशी मॉडेल बनवण्यासाठी प्रोटोटाइप डिझाइन आणि मॉडेलसाठी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीकडून मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एमका या लढाऊ विमानाचे अद्यावत स्टेल्थ फायटर जेट्स खूप महाग आहेत. त्यामुळे ते बाहेरून खरेदी करण्याऐवजी भारत स्वतःच त्याचे अद्यावत मॉडेल तयार करत आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी सोमवारी राज्यसभेत खासदार शांता क्षत्रिय यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, एमकाचे डिझाइन आणि प्रोटोटाइप मॉडेलसाठी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. एमकाचे हे अद्यापत लढाऊ विमान आधीच्या विमानांपेक्षा महाग आहेत, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्र्यांनी संसदेत दिली आहे.
रविवारी झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पावले उचलण्याचे आदेश दिले होते. यामुळे आपली सुरक्षा तर मजबूत होईलच पण आर्थिक विकासालाही मदत होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले होते.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांनी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची ही विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, एनएसए अजित डोवाल उपस्थित होते. या बैठकीनंतर पंतप्रधानांनी लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या प्रमुखांचीही भेट घेतली.
एमका म्हणजे काय?
एमका म्हणजे अद्यावत मध्यम लढाऊ विमान हे भारताचे पाचव्या श्रेणीचे स्वदेशी लढाऊ विमान आहे.गेल्या वर्षी फेब्रुवारी 2021 मध्ये एरो-इंडिया शोमध्ये भारताने प्रथमच एमकाचे डिझाइन आणि मॉडेल जगाला दाखवले होते. हे मॉडेल स्वदेशी एजन्सी एरोनॉटिकल डेव्हलपमेंट आणि DRDO यांनी सादर केले होते. हे भारताचे पहिले दोन इंजिन असलेले लढाऊ विमान आहे. त्याच्या स्टिल्थ वैशिष्ट्यांमुळे शत्रूच्या रडारला ते पकडणे खूप कठीण होते.
महत्वाच्या बातम्या