एक्स्प्लोर
Advertisement
नवज्योतसिंह सिद्धू यांचं पंजाबच्या उपमुख्यमंत्रिपदाचं स्वप्न भंगणार?
चंदीगड : ऐनवेळी काँग्रेसचा हात पकडणाऱ्या नवज्योतसिंह सिद्धू यांचं पंजाबच्या उपमुख्यमंत्रिपदाचं स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. कारण आज होणाऱ्या शपथविधीच्या तालिकेत नवज्योतसिंह सिद्धू यांचं नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे.
नवज्योतसिंह सिद्धू यांच्या नावापुढे कॅबिनेट मंत्री असं लिहिलं आहे. त्यामुळे सिद्धू यांचं उपमुख्यमंत्रिपदाचं स्वप्नं भंगल्यात जमा आहे.
अमरिंदर सिंहांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद नाही?
पहिल्या क्रमांकावर कॅप्टन अमरिंदर सिंह यांचं नाव आहे. ते आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तर दुसऱ्या क्रमांकावर ब्रह्म मोहिंद्रा यांचं नाव असल्याने उपमुख्यमंत्रिपदी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेतृत्वाला सिद्धू उपमुख्यमंत्रिपदी हवे आहेत. मात्र पंजाबच्या विजयाचे शिल्पकार कॅप्टन अमरिंदर सिंह हे मात्र सिद्धू यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या तयारी नाहीत.
पंजाबचा विजय काँग्रेसचा की कॅप्टन अमरिंदर सिंहांचा?
पंजाबमध्ये काँग्रेसने 117 जागांपैकी 77 जागांवर विजय मिळवला आहे. निवडणुकीपूर्वी सिद्धूंनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यावेळी ते अमृतसह पूर्वमधून आमदार आहेत.
पंजाबमध्ये अकाली दलाला झटका, काँग्रेसला बहुमत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement